आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवळाईत कोट्यधीशांत लढत; साताऱ्यात पक्षनिधीचा आधार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा-देवळाईया वाॅर्डांची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरलेली असतानाच काही उमेदवारांच्या संपत्तीमुळे चर्चेला ऊत आला आहे. देवळाई वॉर्डातील शिवसेना, भाजपच्या उमेदवारांकडे कोट्यवधींची संपत्ती असून सातारा वॉर्डातील एका उमेदवाराकडे अवघे एक हजार तर अन्य एका उमेदवाराच्या नावावर एक रुपयाही नसल्याचे शपथपत्रातून समोर आले आहे.
खुल्या वर्गासाठी आरक्षित देवळाई वॉर्डातून आठ, तर अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव असलेल्या साताऱ्यातून तीन उमेदवार रिंगणात आहेत. देवळाईत उमेदवारी देताना आर्थिक सुबत्तेचाही विचार झाल्याचे त्यांच्या संपत्तीच्या विवरणावरून स्पष्ट होते. या उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे सादर केलेल्या शपथपत्रातील माहिती पाहता देवळाई वॉर्डातील शिवसेनेचे उमेदवार हरिभाऊ हिवाळे भाजपचे उमेदवार अप्पासाहेब हिवाळे दोन्ही वॉर्डातील सर्वात श्रीमंंत उमेदवार ठरले आहेत. त्यांच्यापाठोपाठ या यादीत काँग्रेसचे उमेदवार राजू नरवडे यांनी स्थान पटकावले आहे. शेती, दुग्धव्यवसाय करणाऱ्या या उमेदवारांची स्थावर मालमत्तेत सर्वाधिक गुंतवणूक आहे. हरिभाऊ हिवाळे यांची देवळाई, पिंपळगाव पांढरी तसेच पाटोदा येथील कोट्यवधींच्या जमिनीत संयुक्त मालकी आहे. गांधेली सातारा परिसरातही कोट्यवधींची अकृषिक जमीन संयुक्त मालकीत आहे, तर भाजपच्या अप्पासाहेब हिवाळेंकडे ९१ लाख ९० हजार कृषिक तर ५२ लाख रुपयांची अकृषिक जमीन आहे. सेना, भाजप काँग्रेसच्या तीनही उमेदवारांनी शेती, दुग्धव्यवसाय करत असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नामदेव बाजड यांनी मात्र बांधकाम व्यावसायिक असल्याचे नमूद केले आहे. सेना, भाजप काँग्रेसच्या बरोबरीने तेही आर्थिक सुबत्तेत पुढेच आहे. तीन बांधकाम कंपन्यांत भागीदारी तर परिसरात स्थावर मालमत्ता नावावर असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. याव्यतिरिक्त नरवडे यांच्याकडेही स्थावर मालमत्ता कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये भागीदारी असल्याचे नमूद केले आहे. जमिनीमध्ये त्यांच्याकडूनही कोटी रुपयांची गुुंतवणूक असल्याचे शपथपत्रातून समोर आले. सर्व उमेदवारांत हरिभाऊ हिवाळे बाजड यांच्यावरच कर्ज असून अप्पासाहेब हिवाळे यांच्या नावावर एकही वाहन नसल्याचे शपथपत्रात म्हटले आहे.

ठेवी :{बँका ऑफ महाराष्ट्र - हजार ७२० रुपये दागिने - २० तोळे सोने पत्नीच्या नावे १० तोळे सोने { कृषी जमीन - १३ ठिकाणी एकूण ९१.९० लाखांची मालमत्ता { बाळापूर येथे ४३ आर - लाख { देवळाई येथे २० आर -५ लाख { सिंदोन येथे ४० आर - लाख { सिंदोन येथे ३२ आर - दीड लाख { परदारी तांडा येथे २०५ आर { ५.५ लाख { रांजणगाव खुरी येथे ५० आर - लाख २५ हजार { देवळाई येथे ८८ आर - २०.२५ लाख { तोलनाईक तांडा येथे ३३० आर - ८.४० लाख { परदारी येथे १८८ आर { १० लाख { बाळापूर येथे ४० आर - लाख { धोंदलगाव येथे १६२ आर - लाख { परदारी तांडा - ३५ अार - लाख { बाळापूर येथे ६० आर - १४ लाख { देवळाई येथे १९ आर - लाख
अकृषिकजमीन :{ वैजापूर येथे ३.२५ आर - लाख { सातारा येथे आर - ४५ लाख {रांजणगाव एसपी येथे ७५० स्केअर फूट - लाख
दागिने :तोळे सोने तर पत्नी सुनेच्या नावे प्रत्येकी १० तोळे सोने

कृषीजमीन : आडूळयेथे ३० लाखांची, मुलाच्या नावे २५ लाखांची जमीन {
सातारा येथे १.५ कोटींची २९ गुुंठे जमीन {एकनाथनगर येथे ४० लाखांची ९०० चौरस फूट जमीन {दिशा गौरव अपार्टमेंटमध्ये २० लाखांची सदनिका
स्थावर मालमत्ता : {सातारा येथे २६९० चौ. फूट १० लाखांची अकृषिक जमीन, { १७ लाखांची ५३. ८५ चौ. मी. चे घर { एस. बी. एस. डेव्हलपर्समध्ये ५० टक्के भागीदारी { साई समर्थ डेव्हलपर्समध्ये २० टक्के भागीदारी. { पत्नीच्या नावाने साई समर्थ डेव्हलपर्समध्ये २० टक्के भागीदारी { पत्नीच्या नावाने ४० लाख रुपयांची घर/सदनिका { २.८६ लाखांचे वाहन कर्ज तर डी. एच. एफ. एल. कडून १५ लाख ८२ हजार १२९ रुपयांचे कर्ज
दागिने:लाख ७३ हजार ९९४ रुपयांचे सोने, पत्नीच्या नावे १० तोळे
ठेवी : {औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (शाखा-शिवाजीनगर)-२५०० रुपये { औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (शाखा - पंढरपूर)-९ हजार रुपये { भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (शाखा-शिवाजीनगर)११०० रुपये { एच.डी.एफ.सी. बँक (शाखा-सिडको)-२ लाख हजार ५५५ आणि ६० पैसे { एच. डी. एफ. सी. बँक मुदत ठेव - लाख २५ हजार रुपये { एच.डी.एफ. सी. बँक शिल्लक रक्कम - हजार २४९ रुपये
वाहन: दुचाकी,चारचाकी, ट्रॅक्टर
दागिने: तोळेपत्नीच्या नावावर ११ ताेळे
स्थावरमालमत्ता : कृषीजमीन : देवळाईत ४. ९६ आर जमीन - मूल्य ७४ लाख ८३ हजार २०० रुपये (संयुक्त मालकीचे प्रमाण सहापैकी एक )
{ पिंपळगाव पांढरी येथे २४ अार जमीन { मूल्य लाख ३१ हजार रुपये { पाटोदा येथे १५५ आर जमीन - ४६ लाख ५० हजार रुपये { देवळाई येथे २५० आर जमीन - मूल्य १२ काेटी ५० लाख रुपये (संयुक्त मालकीचे प्रमाण सहापैकी एक )
अकृषिकजमीन : { देवळाईयेथे २०९.१० चौ. मी. जमीन - १२ लाख ५४ हजार ६०० रुपये मूल्य (संयुक्त मालकीचे प्रमाण दाेनपैकी एक) { देवळाई येथे १३९.५ चौ. मी. जमीन - लाख ३७ हजार रुपये (संयुक्त मालकीच्या प्रमाण दोनपैकी एक ) { गांधेली येथे ३७१. ७४ चौ. मी. जमीन - लाख ५५ हजार रुपयांची जमीन (संयुक्त मालकीचे प्रमाण दोनपैकी एक ) { सातारा येथे ४९७ चौ.मी. कोटी ६७ लाख २५ हजार रुपयांची जमीन (संयुक्त मालकीचे प्रमाण सहापैकी एक )
कर्ज: { चारचाकीसाठी : लाख ४५ हजार ६७९ रुपये { ट्रॅक्टरसाठी लाख ३७ हजार १८७ रुपये.

साताऱ्यातील उमेदवारांच्या खर्चाचे ओझे पक्षांवरच
सातारा वॉर्डात नवख्यांना संधी देऊन त्यांच्यासाठी निधी उभारण्याची वेळ पक्षांवरच आली. काँग्रेसच्या उमेदवार सायली जमादार यांच्या नावावर एक रुपयाही नाही, असे त्यांनीच विवरणपत्रात म्हटले आहे. शिवसेनेच्या उमेदवार पल्लवी गायकवाड यांच्याकडे एक हजार रुपये असून भाजपच्या उमेदवार सुरेखा बावस्कर तुलनेने पुढे आहेत. काही रोख रकमेसह सोन्याचे दागिने दोन मालमत्ता त्यांच्याकडे आहेत. जमादार या २३ तर पल्लवी गायकवाड या २२ वर्ष वयाच्या असल्याने त्यांच्याकडे संपत्ती नसल्याचे सांगण्यात येत असले तरी आयोगाकडे खर्च सादर करताना उमेदवारांची मोठी तारांबळ उडण्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...