आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Satara Devlai Municipal Council Election: Future Candidates Test Starts

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगर परिषद निवडणूक : भावी उमेदवारांचा लागणार कस !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - किमान १२०० मतदार संख्या असलेल्या वॉर्ड क्रमांक ४ मध्ये शिवसेना भाजपमध्येच चुरस रंगण्याची चिन्हे आहेत. वॉर्डातील कुमावतनगर, छत्रपतीनगर, रहिमनगर हे भाग शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. मागास प्रवर्गासाठी वॉर्ड आरक्षित झाला आहे. पूर्वाश्रमीचे शिवसेनेमध्ये असलेले राजेंद्र कुमावत सध्या भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय असून शिवसेनेचे राजेंद्र राठोड हे दोघेही परिसरातून तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत.

वॉर्ड क्रमांक ४ मधून सलग दोनदा प्रवीण मोहिते काँग्रेसकडून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते, परंतु सध्या ते शिवसेनेमध्ये सक्रिय आहेत. त्यांचा परंपरागत मतदारसंघ मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांनी दुसरीकडे शोधाशोध सुरू केली आहे. या वॉर्डात उच्चभ्रू वसाहतींचा समावेश आहे. वॉर्डांमधल्या काही परिसरामध्ये ग्रामपंचायतीच्या काळात डांबरी रस्ते ड्रेनेजलाइन केल्याचा दावा मोहिते यांनी केला. शिवसेना, भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादीला इथेही कार्यकर्ते व उमेदवारांचा दुष्काळ आहे. चर्चेत असणारा किंवा परिसरात नावाचा दबदबदा असलेला एकही चेहरा काँग्रेस, राष्ट्रवादीकडे नसल्याने येणा-या काळात दोन्ही पक्ष नेमके कोणाला उमेदवारी देतात हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बालेकिल्ला असला तरी
परिसरात हिंदू लोकसंख्या जास्त आहे. सुशिक्षित व उच्चभ्रू लोकवस्ती असल्याने ग्रामपंचायतीच्या काळात काँग्रेसमध्ये असलेले प्रवीण मोहिते दोनदा सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यामुळे इथे कुठलेही धर्म व किंवा जातीचे कार्ड चालणार नसून लोकांचा कल समजून उमेदवार दिल्यास इतर पक्षांच्या उमेदवाराचाही विजय होऊ शकतो, अशी शक्यता नागरिकांनी व्यक्त केली.

अशी आहे वॉर्डरचना
कुमावतनगर, छत्रपतीनगर, रहिमनगर, कौसर पार्क, गट क्रमांक १३६ चा भाग.
परिसराची हद्द - उत्तर : रहिमनगर चौकाकडून पश्चिमेस जय भद्रा किराणा दुकानापर्यंत.
पूर्व : अली मंजील (देवळाई रोड) ते रहिमनगर चौक (देवळाई रोड) पर्यंत.
दक्षिण : स्नेहा ब्यूटी पार्लर (चंद्रशेखरनगर) रोडने पूर्वेकडे डायमंड इंग्लिश स्कूल रस्त्याने देवळाई रोड अली मंजीलपर्यंत.
पश्चिम : जय भद्रा किराणा दुकान रोडने दक्षिणेला चंद्रशेखरनगर रोडकडे स्नेहा ब्यूटी पार्लरपर्यंत.

ठोस उपाययोजना दिसत नाही
सातारा-देवळाईतील या वॉर्ड क्रमांक ४ मध्ये संपूर्ण परिसरात कच-याचे साम्राज्य पसरले आहे. १५ ते १६ वर्षांपासून वसाहत स्थापन होण्यास सुरुवात होऊनही आजपर्यंत कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी ठोस उपाययोजना दिसत नाही. तसेच परिसरातील बहुतांश हातपंप आटलेले आहेत.