आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातारा-देवळाईला जोडणारा रस्ता, पूल बनला धोकादायक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा आणि देवळाई या दोन वॉर्डांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या रस्त्यावरील पूलही धोकादायक बनला असून प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात येथे मोठा अपघात होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तविण्यात येत आहे. या पुलावरून दररोज विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या रिक्षा, बस, ट्रॅक्टर, पाण्याच्या गाड्या आणि दुचाकींची वर्दळ असते. त्यामुळे रस्ता पुलाचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.
तीन वर्षांपूर्वी आमदार संजय शिरसाट यांनी पुढाकार घेऊन सातारा आणि देवळाई गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम करण्यासाठी कोटी १४ लाख रुपये मंजूर करून आणले होते. रस्ता पुलाचे काम करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असूनही त्यांनी ठेकेदाराकडून काम करून घेतले नाही. सातारा गावच्या महादेव मंदिराजवळील पूल धोकादायक बनला आहे. पुलाखाली पाणी साचत असल्याने पूल ढासळत आहे. सध्या पंधरा फुटांचा रस्ता पूल केवळ पाच फूट शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पुलावरून मोठी वाहने जाऊ शकत नाहीत. ही वाहने पुलाच्या बाजूने चिखलातून न्यावी लागतात. प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा अारोप ग्रामस्थांनी केला आहे.

सातारा-देवळाई गावाला जोडणारा पूल पावसामुळे असा खचला आहे. छाया : रवी खंडाळकर
^ नागरिकांनाजीव मुठीत घेऊन पुलावरून प्रवास करावा लागत आहे. तीन वेळा पुलाचे काम करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. ठेकेदाराला कामही देण्यात आले. मात्र शेतकऱ्याची अडचण येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे काम ठप्प आहे. -रमेश बहुले, रहिवासी, सातारा

^रात्री यारस्त्याने ये-जा करणे धोकादायक होते. आता पूल जास्तच ढासळत चालला असून दिवसाही यावरून ये-जा करणे जिवावर बेतू शकते. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र शेतकऱ्याचे नाव पुढे करत काम करण्यात हलगर्जीपणा करत आहे. -सोमीनाथ शिराणे, रहिवासी, सातारा

^रस्त्याचे कामकरण्यास शेतकऱ्याची हरकत असून त्यांनी हे प्रकरण न्यायालयात नेले आहे. तसेच पुलाखाली पाणी असल्याने काम करण्यासाठी अडचणी येत आहेत. -सादिक शेख, सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पश्चिम

^पुलाची स्थिती अत्यंत वाईट असून प्रशासनाकडून पाहणी करण्यात आल्यानंतरही नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. प्रशासनाने त्याची वेळेवर दखल घेतल्यास मोठा अपघात होऊ शकतो. -पद्मसिंग राजपूत, रहिवासी, सातारा
अपघाताची भीती
शेतकऱ्यांचा आक्षेप
सातारागावाच्या सुरुवातीला २०० ते २५० मीटर असलेल्या शेतातून हा रस्ता जात आहे. मात्र रस्त्यामुळे बाधित होत असलेल्या जमिनीचा मावेजा मिळाला नसल्याने शेतकऱ्याने काम करण्यास हरकत घेतली आहे. तसेच हे प्रकरण न्यायालयातही गेले आहे.
ठेकेदारालाकाम दिले
रस्तापुलांचे काम करण्यासाठी कोटी १४ लाख रुपये मंजूर आहेत. िनधी सा. बां. विभागाला मिळाला आहे. यातून तीन पुलांवरचा सिमेंटचा रस्ता, मंदिराजवळचा पूल आणि डांबराचा रस्ता करण्यात येणार आहे. त्यासाठी ठेकेदाराला काम देण्यात आले असून रस्त्यावर पहिला थरही टाकला आहे. मात्र काम बंद पडल्याने या पुलाची स्थिती धोकादायक आहे.
+--------------------------'
बातम्या आणखी आहेत...