आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा-देवळाईत मालमत्तांचे जीआयएस नुसारच सर्वेक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा,देवळाई वॉर्डातील करवसुलीतून जमा होऊ शकणारा १२ कोटींचा निधी मालमत्ता रेकॉर्डवर नसल्याने मनपाला मिळू शकत नाही. त्यामुळे दोन्ही वॉर्डांतील मालमत्तांचे नियमितीकरण करण्याचे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत दिले होते. आता या दोन्ही वॉर्डांतील मालमत्तांचे “जीआयएस’द्वारे सर्वेक्षणही करण्यात येणार आहे. “दिव्य मराठी’ने २७ ऑगस्ट रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून या मुद्द्याकडे मनपाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत मनपाने हा निर्णय घेतला आहे. शहरातील मालमत्ताधारकांकडून कर आकारण्यासाठी खासगी संस्थेला काम देण्यात आले आहे. मात्र, उपनियम नसल्याने खासगी संस्था तयार होत नव्हती. उपनियमांना नियमित करण्यासाठी घेतलेल्या या सर्वसाधारण सभेत राजेंद्र जंजाळ यांनी यात सातारा, देवळाईचा समावेश करण्याची मागणी करून नियमितीकरणापूर्वी दुप्पट कर लावू नये, अशी सूचना केली होती. त्यानुसार महापौर त्र्यंबक तुपे यांनीही मालमत्ता नियमित करूनच कर आकारण्याचे आदेश दिले. गुंठेवारीसह आणि सातारा, देवळाईतील मालमत्ता नियमित होत नाहीत, तोपर्यंत तिथे दुप्पट कर लावू नये, असे आदेशही तुपे यांनी दिले आहेत. त्यानुसार मालमत्ता कर आकारणी विभागाने सातारा, देवळाईचा समावेश खासगी संस्थेकडून होणाऱ्या सर्वेक्षणात केला आहे.
पाठपुराव्याला यश
^‘दिव्यमराठी’तवृत्त प्रकाशित झाल्यानंतर शहरात "जीआयएस’द्वारे होणाऱ्या सर्वेक्षणात सातारा वॉर्डाचा समावेश करावा, यासाठी मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले असून लवकरात लवकर सर्वेक्षणास सुरुवात करणे आवश्यक आहे. सायलीजमादार, नगरसेविका, सातारा

निधीचे रडगाणे दूर होणार
सर्वेक्षण आणि करमूल्य निर्धारणाची प्रक्रिया पार पाडताना मनपाने या दोन्ही वॉर्डांचा विचार केल्यामुळे निधीची अडचण दूर होणार आहे. सर्वेक्षणानंतर दोन्ही वॉर्डांतील मालमत्ता रेकॉर्डवर येतील. करवसुलीमुळे दरवर्षी १४ कोटींचा निधी उभा होईल. या निधीतून दोन्ही वॉर्डांत मूलभूत सोयी-सुविधा पुरवणे शक्य होईल. सातारा-देवळाईत ग्रामपंचायतीकडे नोंद असलेल्या मालमत्तांची संख्या ३० हजार आहे. ही संख्या वर्षभरापूर्वीची असून या भागात ५०० पेक्षा जास्त अपार्टमेंट असल्याने मालमत्तांची संख्या ७० हजारांच्या आसपास असू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दोन्ही वॉर्डांतील १५० जणांनी स्वत:हून कर जमा केला असून अशा सजग नागरिकांसाठी मनपाचा हा निर्णय दिवाळी भेट ठरणार आहे.

सर्वेक्षण करण्यास मनपाही सक्षम
^पूर्वी शहरातील कर आकारणी, वसुलीची कामे मनपा प्रशासनाद्वारे होत असल्याने कामाचा भार अधिक पडत होता. आता शहरात खासगी संस्थेकडून सर्वेक्षण केले जाणार असून त्यात सातारा-देवळाईचा समावेश करण्यात आला आहे. येथील मालमत्ता कमी असल्याने मनपा प्रशासनही सर्वेक्षण करण्यास सक्षम आहे. वसंत निकम, करमूल्य निर्धारण अधिकारी
बातम्या आणखी आहेत...