आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satara Gram Panchayat Dimand Issue At Aurangabad

नाल्यातील माती काढून सिमेंटचे कठडे लावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नाल्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. वर्षानुवर्षे वाहत असलेल्या नाल्यात मातीचा भर टाकून नाला बुजवण्याचे प्रकारही समोर येत आहे. देवळाईकडून मोदी टॉवरमार्गे वाहणाऱ्या नाल्यात मातीची भर टाकण्यात आली. परिणामी, संपूर्ण चावडा कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरले. सातारा ग्रामपंचायतीने गुरुवारी तत्काळ जेसीबी मशीनने नाल्यातील माती काढून नाला मोकळा केला, परंतु नाल्याच्या बाजूला मातीचे दिगारे पडल्यामुळे नाल्याच्या कडेला सिमेंटचे कठडे बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

गट नं. १४० मध्ये श्रवणलाल मोदी यांच्या खासगी प्लॉटच्या बाजूने देवळाई मोरया हॉटेलमार्गे नाला वाहत होता. नाल्यात भर टाकण्यात आली. त्या बाजूला इमारत उभारण्यात आली. त्यामुळे नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याला मार्ग नसल्याने पाणी उलट्या दिशेने परत येऊन चावडा कॉम्प्लेक्सच्या ४० दुकानांसमोर साचले आहे. याबाबत दुकानदारांनी पोलिस प्रशासन, सातारा ग्रामपंचायत आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तत्काळ नाल्यातील भर काढून पाणी जाण्यासाठी वाट करावी, अशी मागणी केली आहे.
जेसीबीने केला नाला मोकळा
सातारा हद्दीत असलेल्या नाल्यात टाकण्यात आलेली मातीची भर काढून टाकण्यासाठी ग्रामविकास अधिकारी बी. टी. साळवे व तलाठी अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबी लावून नाला मोकळा करण्याची कारवाई सुरू केली. यासाठी ग्रामपंचायत सदस्य अनिता कुमावत, प्रवीण मोहिते, विजया ढवळे, अरुण कदम, अजमत पटेल, सुभाष पारखे, कैलास बोर्डे, कैलास काळे, अयुब खान पठाण, पाैर्णिमा भुजबळ आदींचे सहकार्य होते.
काही वर्षांपासून वाहत असणारा नाला बुजवला. ग्रामपंचायतीने केलेली कारवाई योग्य आहे, परंतु यावर कायमस्वरूपी उपाय करायला हवे.
अनिल पटेल, श्रीजी स्टाइल ट्रेडर्स
नाला मोकळा केल्यामुळे दुकानांसमोरील साचलेल्या पाण्याला वाट मिळाली, परंतु अजूनही नाल्याच्या बाजूला मातीचे ढिगारे आहेत.
यशवंत नेरकर, न्यू प्रगती हार्डवेअर
नाल्याच्या कडेला सिंमेंटचे कठडे बांधले पाहिजे. जेणेकरून नाल्यात मातीचे ढिगारे जाणार नाहीत.
विशाल जैन, रहिवासी