आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम पाडणार्‍यांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सातारा परिसरातील सुरेश जोशी यांच्या 1,237 चौरस फुटांच्या प्लॉटवरील बांधकाम बेकायदेशीररीत्या पाडणार्‍या विकास राऊत आणि दीपक राऊत यांच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतर शनिवारी (9 फेब्रुवारी) या दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

जमिनीशी काहीही संबंध नसताना राऊत बंधूंनी जोशींच्या प्लॉटवरील अकरा कॉलम आणि बत्तीस पत्र्यांचे बांधकाम पाडले होते. याची तक्रार सातारा पोलिसांकडे करण्यात आली होती. तसेच पोलिस आयुक्त संजयकुमार यांनाही निवेदन दिले होते. शुक्रवारी दुपारी जोशी, डॉ. भालचंद्र कांगो यांनी आयुक्तांची भेट घेतली. 35 मिनिटे चर्चा झाल्यानंतर आयुक्तांनी राऊत बंधूंविरु द्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार शनिवारी दुपारी दोघांविरुद्ध बेकायदेशीररीत्या बांधकाम पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

‘माझा काहीही संबंध नाही’

भारिप बहुजन महासंघाचे महासचिव अँड. रमेश खंडागळे यांनी धमकावल्याची तक्रार जोशी यांनी सातारा पोलिस ठाण्यात दिली आहे. मात्र, त्यांचा आरोप अत्यंत चुकीचा व बिनबुडाचा आहे, असे खंडागळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. पोलिस ठाण्यात राऊत आणि जोशी आपापली बाजू मांडत असताना मी त्या वेळी तेथे उपस्थित होतो. राऊत बंधू भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी विनंती केल्यामुळे मी तेथे गेलो होतो. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायालयाचा अंतिम निकाल दोघांनीही मान्य करावा. जोशी आणि राऊत यांनी कायद्याचा आदर करूनच प्रकरण निकाली काढावे, असेही त्या वेळी सांगितल्याचे खंडागळे यांनी म्हटले आहे.