आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा भागात बांधकाम बंदी, 600 कोटींचे व्यवहार ठप्प!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पाणीटंचाईमुळे सातारा आणि देवळाई परिसरातील बांधकामे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा जारी केले. यामुळे परिसरातील किमान 600 कोटींचे बांधकाम व्यवसाय ठप्प होणार आहेत. किमान एक लाख मजूर बेरोजगार होणार आहेत. येत्या 15 एप्रिलपासून हे आदेश लागू होणार असून, पावसाळ्यापर्यंत ते राहतील. यामुळे परिसरातील घरे, फ्लॅटच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महानगरपालिका हद्दीतील बांधकामे मात्र थांबवण्यात आलेली नाहीत. त्यास बिल्डरांनी आक्षेप घेतला. पाण्याचा वापर वाढणार असल्याने बांधकामे बंद करण्याची विनंती जिल्हाधिकाºयांकडे यापूर्वीही करण्यात आली होती. मात्र, शहरात सव्वा लाख मजूर बेरोजगार होणार असल्याने त्यांनी नकार दिला होता. सातारा परिसरात भूजल पातळी घटली आहे. पिण्यासाठी पाणी नसेल तर बांधकामासाठी पाणी वापरणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे दुसरा पर्याय नव्हता, असा युक्तिवाद जिल्हाधिकाºयांनी केला आहे. दरम्यान, परिसरातील अनधिकृत बांधकामे बंद करावीत, अशी मागणी बिल्डर्सकडून होत आहे.

घरे, फ्लॅटच्या किमती वाढतील
बांधकामांवर बंदी हा पर्याय नाही. 15 दिवसांचा अवधी द्या, अशी विनंती केली. 15 एप्रिलपासून कामे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्याचे सांगितले गेले. आदेश असतील तर पर्याय नाही; पण आमचाही विचार व्हावा. 600 कोटी रुपये गुंतले आहेत. घरे, फ्लॅटच्या किमती यामुळे वाढतील.’
विवेक भाकरे, सदस्य, बिल्डर्स असोसिएशन

दुसरा पर्यायच नव्हता
सातारा परिसरात पिण्यासाठी पाणी नाही आणि बांधकामे मात्र सुरू आहेत, अशा तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे बांधकामे बंद करण्याखेरीज दुसरा कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही. दुसरा पर्यायही नव्हता. तथापि, महापालिका हद्दीतील बांधकामे मात्र थांबवण्यात आलेली नाहीत.’
विक्रमकुमार, जिल्हाधिकारी

पुढे काय ?
० बिल्डरांचे किमान 600 कोटी रुपये विविध प्रकल्पांत गुंतले आहेत.
० अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण न झाल्यास बांधकाम खर्च वाढेल.
० पुढे घरे खरेदी करणाºयांना जास्त रक्कम मोजावी लागेल.
० एक लाख मजूर बेरोजगार होतील.
० उपासमार झाल्यास कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.