आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चाचा आज सत्याग्रह, शहागंजमधील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा मोर्चाच्या वतीने गुरुवारी सकाळी ११ वाजता शहागंज येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ एकदिवसीय सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे, तर २९ ऑक्टोबर रोजी संत तुकाराम महाराज नाट्यगृहात पहिली मराठा महासभा आयोजित केली आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक रवींद्र काळे, प्रा. माणिकराव शिंदे, रमेश केरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 
 
काळे म्हणाले की, मराठा समाजाचे विविध प्रश्न, समस्या न्याय्य हक्काच्या मागण्यांसाठी समाजाने शांततेत ५८ मोर्चे काढले आहेत. मुंबई मोर्चात सरकारने सर्व प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती. त्यास दोन महिने उलटले तरी कृती झाली नाही. सरकारच्या थापामुळे मराठा तरुण युवक संतप्त झाला आहे. मराठा आरक्षणासाठी काय केले? स्वामिनाथन आयोग, अॅट्रॉसिटीचा दुरुपयोग थांबलेला नाही. शेतकरी कर्जमाफी कुणाला मिळाली? कोपर्डी प्रकरणातील आरोपींना शिक्षा झालेले नाही. मुख्यमंत्र्यांनी सहा महिन्यांत निकाल लावण्याची ग्वाही दिली होती. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाचे पंतप्रधानांनी थाटामाटात उद््घाटन केले. त्याचे पुढे काहीच नाही. झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जाग करण्यासाठी १९ ऑक्टोबर रोजी सत्याग्रह आंदोलन आणि २९ ऑक्टोबर रोजी मराठा महासभा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी रमेश केरे, प्रा. माणिकराव शिंदे, किशोर चव्हाण, सुनील कोटकर, अशोक वाघ, सतीश वेताळ, प्रशांत इंगळे, परमेश्वर नलावडे, योगेश केवारे, भरत कदम, गणेश वडकर, तुषार शिंदे, नीलेश ढवळे आदी उपस्थित होते. 
 
चंद्रकांत पाटलांना समितीवरून हटवा 
मुख्यमंत्र्यांनीमराठा आरक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली आहे. त्यांच्यावर आमचा विश्वास राहिला नाही. त्यांनी त्वरित हटवण्यात यावे. खासदार संभाजी महाराज, नारायण राणे, नितेश राणे यांनीही स्वार्थासाठी मराठा समाजाचा उपयोग केला. त्यांना समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे मराठा क्रांती मोर्चाने म्हटले आहे. 
बातम्या आणखी आहेत...