आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचा वृद्ध यात्रेकरू सहा दिवसांपासून सौदीच्‍या कारागृहात; विना पासपोर्ट फि‍रताना अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद – पवित्र हज यात्रेसाठी सौदी अरेबिया गेलेल्‍या औरंगाबादच्‍या नागरिकाला मक्‍का शहरात पोलिसांनी अटक केली. तो सहा दिवसांपासून तिथे कारागृहात आहे.
शहरातील काही भाविक एका खासगी ट्रॅव्‍हस कंपनीकडून हज यात्रेसाठी 23 जूनला मक्‍का येथे रवाना झाले होते. यामध्‍ये शेख मन्सूर आणि त्यांच्या पत्नी रहिमाबी (इंदिरानगर) हे वृद्ध दाम्पत्यही सभागी होते. त्‍या ठिकाणी कंपनीच्‍या एजंटने यात्रेकरूंचे पासपोर्ट स्वत:कडेच ठेऊन घेतले. दरम्‍यान, शेख मन्‍सूर विना पासपोर्टचे हॉटेल बाहेर पडले. मात्र, त्‍यांच्‍याकडे पार्सपोर्ट नसल्‍याने त्‍यांना तेथील पोलिसांनी अटक केली. त्‍या दिवसापसून ते कारागृहात आहेत.
बातम्या आणखी आहेत...