आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Savarkar Jayanti Celebration Issue At Aurangabad, Divya Marathi

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या-सर्वपक्षीय सावरकरप्रेमी मित्रमंडळची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशासाठी प्राणाची आहुती देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे कार्य आतापर्यंत दुर्लक्षित राहिले. मात्र, आज भारताच्या संसदेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती साजरी झाली आणि ऊर भरून आला. सावरकरांना भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी सावरकरप्रेमी मित्रमंडळाचे प्रमुख भाऊ सुरडकर यांनी केली.
सर्वपक्षीय सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त बुधवारी (28 मे) अभिवादन करण्यात आले.त्याप्रसंगी ते बोलत होते. सिटी चौक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या पुतळ्यास पुप्पहार अर्पण करून सायंकाळी 6 वाजता शोभायात्रा काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात काढलेली शोभायात्रा सिटी चौक, गुलमंडी, औरंगपुरा, निराला बाजारमार्गे सर्मथनगर येथे समारोप करण्यात आला.
या वेळी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या सर्मथनगर येथील कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी दयाराम बसैये बंधू, भाऊ सुरडकर यांनी मनोगत व्यक्त केले. देशातील सर्व शासकीय कार्यालयात सावरकरांची प्रतिमा असावी आणि शहरात सावरकर संशोधन केंद्र निर्माण व्हावे. या निमित्ताने तरुणांना सावरकरांची ओळख होईल, त्यांचे विचार तरुणाईपर्यंत पोहचवण्याचे गरज आहे.विज्ञाननिष्ठ सावरकरांचे विचार प्रेरणादायी आहे त्यांच्या कार्याला उजाळा मिळेल,अशा मागण्या मंडळाकडून करण्यात आल्या आहे. या वेळी लता दलाल, नगरसेवक समीर राजूरकर, गोपाळ कुलकर्णी, पृथ्वीराज पवार, नंदू घोडेले, अनिल खंडाळकर, सुरेंद्र कुलकर्णी, सुमीत खांबेकर, अमित भांगे, निनाद खोचे, स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मी नारायण जैस्वाल यांची उपस्थिती होती. प्रमोद सरकटे यांच्या स्वरराज ग्रुपने या वेळी सावरकरांवरील गीतांचा कार्यक्रम सादर केला. बंडू ओक यांनी सूत्रसंचालन केले, तर राजू वैद्य यांनी आभार मानले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करताना सावरकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजू वैद्य, नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी, नगरसेवक पंकज भारसाखळे.
विविध संस्था,संघटनांनी घेतले कार्यक्रम
.गणेशनगर, शिवसेना शाखा
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त बुधवारी (28 मे)विविध राजकीय, सामाजिक संघटना व शासकीय निमशासकीय संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त शहरातील विविध 80 चौकांत त्यांना अभिवादन करण्यात आले. मान्यवरांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. उत्सव समितीच्या वतीने सायंकाळी सिटी चौकातून शोभायात्रा काढण्यात आली.

संस्कार प्रबोधिनी प्रशाला:
शिवशंकर कॉलनीतील संस्कार प्रबोधिनी प्रशालेत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी अधिकारी सुभाष पाटील यांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शालेय समिती सदस्य नीळकंठ, सचिव जयंत लालसरे, मुख्याध्यापिका एस. टी. कुलकर्णी, एन. पी. लोणीकर आदीसह परिसरातील नागरिकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.