आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीपासून ८३ हजार शालेय विद्यार्थिनी वंचित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहर जिल्ह्यातील पाचवी ते आठवी इयत्तेतील सुमारे ८३ हजार मुली सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. बँक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार निदर्शनास आला आहे.
शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत प्रती शैक्षणिक वर्षाकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या जाती जमाती संवर्गातील मुलींना वर्षाला ६०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु ही शिष्यवृत्ती वितरित केली नाही. समाजकल्याण राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये अनेक अडचणी समान आहेत.

केंद्र राज्य शासनाकडून वंचित घटकातील विद्यार्थीशिक्षणाच्या प्रवाहात येऊन साक्षरतेचा टक्का वाढला पाहिजे. मुलींचे गळतीचे प्रमाण कमी होऊन मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या पाहिजेत, यासाठी विविध शिष्यवृत्ती योजना मुलींसाठी राबविण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे बँक खाते, माहिती देणे नुसती याची कटकट नको म्हणून वर्गशिक्षक संबंधित शाळेचे मुख्याध्यापक हे शासनाकडून मिळणाऱ्या या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी निरुत्साह दाखवित आहेत. काही शाळा शिष्यवृत्तीची माहिती भरताना बँक खात्यासह इतर माहिती व्यवस्थित भरत नसल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत आहेत.
समाजकल्याण विभागाकडून सात प्रकारची तर माध्यमिक शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली प्रकारची शिष्यवृत्ती घेतली जाते. प्राथमिक, खासगी विनाअनुदानित, अनुदानित शाळेतील विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा साधारणपणे ८० हजारांहून अधिक विद्यार्थी लाभ घेतात. शिष्यवृत्तीमध्ये होणारा गोंधळ कमी करण्यासाठी शासनाकडून ऑनलाइन प्रणाली आहे. परंतु ऑनलाइनच किचकट बनली आहे. संबंधित विद्यार्थ्याने दिलेल्या बँकेतच शिष्यवृत्तीचे पैसे जमा होत असल्याने मुख्याध्यापक वर्गशिक्षकांनाही काहीच कळत नाही.

शिष्यवृत्तीमधील प्रमुख अडचणी
बहुतांश वेळा पाचवी अथवा आठवी पास झाल्यानंतर विद्यार्थी स्थलांतर होतात. स्थलांतरित झाल्याची नोंद कळवल्याने अडचण होते.
ऑनलाइन अर्ज दाखल करताना बहुतांश वेळा खाते क्रमांक अथवा आयएफसीचा कोड चुकीचा दाखल होणे प्रत्येक वर्षी अर्ज नूतनीकरण होणे, त्यामुळे एकाच वर्षीची शिष्यवृत्ती मिळते
ऑनलाइन प्रक्रियेसाठी पालक विद्यार्थी अनभिज्ञ असतात

माध्यमिक शिक्षण विभागाच्या अंतर्गत शिष्यवृत्तीधारकांची माहिती शासनाकडून पाठवून माध्यमिक विभागाकडून निधी वितरित होतो. त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
१०००~ पाचवीशिष्यवृत्ती असून ती पास झाल्यानंतर आठवीपर्यंत प्रतिवर्षी मिळतात
१५००~ आठवीशिष्यवृत्तीमध्ये पास झाल्यानंतर नववी दहावीसाठी प्रतिवर्षी मिळतात
६000~ : एनएमएमएसही आठवीतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. ही पास झाल्यानंतर बारावीपर्यंत वर्षाला हजार रुपये दिले जातात.

एनटीएस १० वीतील मुलांसाठी घेतली जाते. ही परीक्षा पास झाल्यानंतर ११ १२ वीपर्यंत हजार, बी.एस्सी. पीएच.डी.साठी वर्षाला ८० हजार रुपये, १० साठी एनएस आयजीएस शिष्यवृत्ती एससी मुलींसाठी घेतली जाते.

शिष्यवृत्तीपासून वंचित
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती, मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीसह आयटीआयमधील विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते. दहावीच्या सर्व मुलांना परीक्षा शुल्क दिले जाते. या सर्व शिष्यवृत्ती समाजकल्याण विभागाकडून वितरित करण्यात येतात. या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइनद्वारे अर्ज मागविण्यात येतात. पालकांना अपुरे ज्ञान मुख्याध्यापकांचे व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नसल्याने अनेकजण शिष्यवृत्ती घेण्यापासून वंचित राहत आहेत.

वितरण लवकर नाही
संबंधित शाळा विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीची माहिती ऑनलाइनद्वारे भरून गट शिक्षणाधिकारीमार्फत पाठवून देतात. परंतु शिष्यवृत्तीचे लवकर वितरण होत नसल्याची पालक तक्रार करतात. समाजकल्याणच्या कॅश बुकला ३१ मार्च २०१६ रोजी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचा निधी खर्ची पडला आहे, असे दाखविले आहे. लाभधारक मुलींचे विविध शाखेत बँक खाते आहेत. परंतु आयसीआयसीआय बँकेचे एसबीआय बँकेला चेक आले असून खात्यानुसार जमा करण्यास सांगितले आहे.

पैसे वितरित नाहीत
^ऑनलाइनप्रणालीमुळेशिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली किंवा नाही हे कळत नाही. ईबीसीचे तीन वर्षापासून शाळांना पैसे वितरित करण्यात आलेले नाहीत. तानाजीमाने, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघटना

खात्यावर जमा नाही
^फुलेदत्तक योजनेअंतर्गत प्रतिवर्षी सहाशे रुपये शिष्यवृत्ती दिला जाते. चालू शैक्षणिक वर्षात अद्यापपर्यंत शिष्यवृत्ती दिली नसून सुमारे ८३ हजार विद्यार्थिनी वंचित आहेत. समाजकल्याण अधिकारी सभापती यांना कळविले आहे. तरीदेखील दुर्लक्ष होत आहे. शिवानंदभरले, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ

पूर्तता करणे गरजेचे
^शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पूर्तता वर्गशिक्षक मुख्याध्यापकांनी करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती २०१२ पासून पेंडिंग आहेत. माहिती मुख्याध्यापकांकडून मागवून घेतली आहे. त्यांची शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल. सत्यवान सोनवणे, शिक्षणाधिकारी

खाते काढले पण..
^शाळेकडूनबँकेचे खाते काढण्यास सांगितले. त्यानुसार आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करून दिली. दोन वर्ष झालेत शिष्यवृत्तीच मिळाली नाही. नवीन खाते काढण्याचा सल्ला दिला जातोय. राजूकांबळे, पालक

^समाजकल्याण कडूनदेण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्तीसाठी कॅम्प लावण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार प्रत्यक्षात २२ सप्टेंबरपासून कॅम्पला सुरुवात होईल. गत वर्षी दिलेले खाते क्रमांक चुकीचे दिले. त्यामुळे पैसे वर्ग करण्यासाठी बँकेत अडचणी आल्या आहेत. छायागाडेकर, समाजकल्याण अधिकारी
बातम्या आणखी आहेत...