आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: \'सावली उन्हाची\'तून मांडली भारतीय संस्कृती, नाट्यमहोत्सवाला उद्दंड प्रतिसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित कामगार नाट्य स्पर्धेत श्रमशक्ती कला आविष्कार, केंद्र कोतवालपुराच्या वतीने रणजित देसाई लिखित "सावली उन्हाची' हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकातून कलाकारांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले.
ललित कला भवनमध्ये सोमवारी नाटकाचे सादरीकरण झाले. या नाटकाचे दिग्दर्शन नागनाथ काजळे यांनी केले. नाटकाचे नेपथ्य - मुकुंद कुलकर्णी, संगीत - रविंद्र स्वामी, प्रकाश योजना - नागनाथ काजळे, वेशभुषा - अल्का पवार, रंगभुषा - वंदना बनकर, रंगमंच व्यवस्था - सुशील बनकर, संतोष वैद्य यांनी केले. तर मुख्य भूमिकेत राहुल रणसुभे, शहाजी इंगोले, मीनाक्षी टाक, माधवी देशपांडे, समृद्धी बाजी पाटील, अक्षय पवार, महेश देशपांडे, संजय बाजी पाटील यांनी भूमिका साकारल्या.
नाटकाच्या कथेत मुंबईतील मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या रवी चित्रे यांच्या पत्नीचा प्रसुती दरम्यान मृत्यू होतो. मात्र, बाळ सुखरूप असते. मुलाचा संसार पुन्हा उभा राहावा अशी, त्याच्या आईची इच्छा असते. ती भावाला स्थळ शोधायला सांगते. नंतर पुण्याच्या शुभदा या मुलीशी रवीचे लग्न होते. मात्र, आपले लग्न जबरदस्तीने झाल्याचे आणि एका परजातीच्या मुलावर (सारंग) प्रेम असल्याचे ती सांगते. रवी सारंगच्या शोधात निघतो. सारंग पटकथाकार असतो. त्यामुळे रवी त्याला पटकथा लिहायला घरी बोलावतो घरी शुभदा, सारंगची भेट होते. तेवढ्यात रवी येतो. तो सारंगला त्याची अमानत घेऊन जाण्यास सांगतो. तेव्हा भारतीय संस्कृतीत लग्न झालेल्या मुलीचे सर्वस्व तिचा पतीच असतो, असे सांगत निघून जातो. शुभदाला त्याचे कौतुक वाटते आणि ते आनंदाने संसार करू लागतात.
पात्र परिचयः
मामाः राहुल रणसुभे
डॉ. रवि चित्रेः शहाजी इंगोले
शुभदाः मिनाक्षी टाक
आईः माधवी देशपांडे
केशवः अक्षय पवार
पिंकीः समृध्दी बाजी पाटील
सारंगः महेश देशपांडे
शेखरः संजय बाजी पाटील
पुढील स्लाईडवर पाहा, नाटकाती काही क्षणचित्रे...