आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायगव्हाण शिवारातून चार ट्रॉली अवैध वाळू जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
नागद - चार ट्रॉलींद्वारे अवैध वाळूसाठा घेऊन जाणारे दोन ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई सायगव्हाण परिसरात बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास करण्यात आली. नागदवरून सातकुंड आदर्शनगर येथे ट्रॅक्टरद्वारे वाळू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिस निरीक्षक एस. एन. भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप अंबादास काळे, बीट जमादार पी. एस. इंगळे आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली.
ट्रॅक्टरसह वाळूने भरलेल्या चार ट्रॉली नागद पोलिस चौकी येथे जमा केले असून पुंडलिक पंडित पवार, अर्जुन चंदू पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नागदसह पाचोरा, भडगाव येथून चोरट्या मार्गाने वाळू तस्करी होत असल्याने पोलिसांसह महसूल विभागाने वाळू माफियांविरुद्ध धडक कारवाईची मोहीम सुरू केली असून ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक भुजंग यांनी सांगितले
बातम्या आणखी आहेत...