आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरातील सर्कशीमध्ये औरंगाबादी आवाज,सर्कसची दुनियाच वेगळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -
‘मुस्कराओ ऐसे की पहाडों को होश जाए,
तालियां बजाओ ऐसे की कलाकारों मे जोश जाए’

कोणत्याही सर्कसमध्ये कलाकारांच्या बरोबरीनेच टाळ्या मिळतात त्या निवेदकाच्या खुमासदार निवेदनाला; पण अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की देशातील बहुतांश सर्कसना असणारा आवाज औरंगाबादचा आहे. शहरातील ज्येष्ठ निवेदक सय्यद अफसर काश्मिरी हे वेगवेगळ्या सर्कशीत निवेदनासाठी देशभरात मागणी असणारे कलावंत अाहेत. यामुळे सर्कस कोणतीही असली तरी त्यासाठी निवेदन काश्मिरी यांचेच असते.

६९ वर्षांचे सय्यद अफसर काश्मिरी हे मूळ औरंगाबादचे. ज्युबिली पार्कजवळ ते राहतात. आझाद महाविद्यालयात बीएस्सीचे शिक्षण घेतले. मात्र, त्यांचे मन कविता, शेरोशायरीतच रमले. यामुळे कार्यक्रमांच्या निवेदनाची कामे मिळत होती. १९८४ मध्ये नारळीबागेत ग्रेट रॉयल सर्कस अाली. दक्षिण भारतातील असल्याने याच्या निवदेनाचे काम दक्षिण भारतीय निवेदक करत होता. मात्र, त्याचे निवेदन काही चांगले होत नसल्याचे काश्मिरी यांनी मालक वालावलकर यांना सांगितले. त्यांनी अफसर काश्मिरी यांनी निवेदन करण्याची विचारणा केली. काहीही तयारी नसताना त्यांनी असे काही निवेदन केले की प्रेक्षक खुश झाले. येथून सर्कसमध्ये निवेदन करण्यासाठी त्यांचा प्रवास सुरू झाला.

^स्टेज शोचेनिवेदन, सर्कसचे निवेदन वेगळे आहे. स्टेश शोमध्ये निवेदक लोकांना दिसतो. सर्कसमध्ये केवळ आवाज येतो. लोकं कलाकारांचे कर्तब बघण्यासाठी येतात. पण आपल्या निवेदनामुळे कलाकारांचा उत्साह वाढतो. याचा वेगळा आनंद मिळतो. -सय्यद अफसर काश्मिरी, निवेदक, दि ग्रेट बॉम्बे सर्कस


स्टेज शोचे निवेदन
सर्कसनसते तेव्हाही अफसर काश्मिरी बिझी असतात. शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमांसह जाॅनी लिव्हर, अल्ताफ राजा, गोविंदा, पूर्णिमा अशा कलावंतांच्या कार्यक्रमाचे निवेदन त्यांनी केले आहे. वृत्तपत्रे, नवनवीन पुस्तकांचे वाचन, टीव्हीवरील जुन्या गाण्यांचे कार्यक्रम ऐकणे यातून आपोआप निवेदनासाठी आवश्यक साहित्य तयार होते, असे ते सांगतात.
बातम्या आणखी आहेत...