आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिफ्ट कार्ड घ्या, खरेदी करा आणि फेकून द्या!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रीपेड मोबाइलसाठी ज्याप्रमाणे आपण ‘टॉपअप’ करतो. त्याप्रमाणे एका वेळच्या शॉपिंगसाठी अथवा पुननरूतनीकरणाचे स्वत: बनवलेले गिफ्ट कार्ड वापरण्याचा नवा ‘ट्रेंड’ शहरात आला आहे. शंभर ते पन्नास हजार रुपयांपर्यंत आपण कार्डात रिचार्ज करून मनसोक्त खरेदी झाली क‘ी, स्वत:च कार्ड नष्ट करू शकतो. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) लाँच केलेल्या या ‘भन्नाट’ सुविधेचा आत्तापर्यंत 22 हजार ग्राहकांनी उपयोग केला आहे.

क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, किंबहुना एटीएम कार्ड या संकल्पनेवर आधारित आता एसबीआयने ‘इन्स्टंट व्हच्यरुअल क्रेडिट कार्ड’ म्हणजेच अस्थायी स्वरूपाचे आणि एक वेळच्या खरेदीपुरत्या कार्डांची सुविधा आणली आहे. या सुविधेसाठी बँकेत स्वतंत्र खाते सुरू करण्याचे अथवा डिपॉझिट भरण्याचीही गरज पडत नाही. बँकेत आपले खाते असेल तर नेहमीच्या डेबिट कार्डमधून आपण काही रक्कम अस्थायी स्वरूपाच्या डेबिट कार्डमध्ये वळती करू शकतो. जेवढी खरेदी करायची आहे किंवा जेवढय़ा पैशांची आपल्याला गरज आहे तेवढय़ाच रकमेचा वापर होऊन कार्ड पुन्हा आपल्याला नष्ट करता येते. त्याशिवाय ‘अस्थायी’ कार्डामध्ये काही रक्कम शिल्लक राहिल्यास ती रक्कम आपोआप आपल्या मूळ खात्यावर जमा होते. अशा प्रकारच्या सुविधा ग्राहकांना दिल्यामुळे कार्डचा दुरुपयोग करणार्‍यांना प्रतिबंध बसण्याची जोरदार शक्यता आहे. ‘अस्थायी कार्ड’ जर चोरीला गेले तर जेवढय़ा रकमेचे त्यामध्ये रिचार्ज केलेले आहे, तेवढय़ाच रकमेचे नुकसान होईल. या कार्डांना ‘3 डी सेक्युअर सिस्टिम’द्वारे तयार केल्यामुळे ते ‘फ्रॉडप्रूफ’ असणार आहे.

असा होऊ शकतो वापर
रेल्वे आणि विमानांच्या तिकिटांची बुकिंग, रेस्टॉरंट आणि हॉटेलिंग, मोबाइल रिचार्ज, इलेक्ट्रिक बिल, ऑनलाइन शॉपिंग आणि मॉलमधील खरेदीचा आनंद, कामगार, कर्मचार्‍यांची देयके अथवा ज्या दुकानांमध्ये पीओएस (पॉइंट ऑफ सेल) यंत्राची सोय आहे त्या ठिकणी या कार्डांचा वापर होऊ शकतो.

वैधता नूतनीकरण करता येते
आमच्या बँकेमार्फत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डप्रमाणे जीआरसी कार्ड आणि गिफ्ट कार्ड दिले जातात, विभागामध्ये आत्तापर्यंत 22 हजार ग्राहकांनी या सुविधेचे लाभ घेतला आहे. अस्थायी स्वरूपाच्या कार्डांसाठी बँकेत खाते असणे आवश्यक नाही, बँकेत आगाऊ पैसे जमा करणार्‍यांना असे प्रीपेड कार्ड दिले जातात. या कार्डांचा सर्वाधिक वापर कंत्राटदार आपल्याकडील मजुरांचे पगार करण्यासाठी वापरतात.
शिवचरण फोकमारे, एजीएम, एसबीआय