आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्यांच्या काळात घोटाळा, तेच करत होते चौकशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जलसंपदा विभागातील वाहन घोटाळ्याचा तपास आता वडिगोद्री येथील कार्यकारी अभियंत्याकडे सोपविण्यात आला आहे. अधीक्षक अभियंता ए. आर. कांबळे यांनी ही माहिती दिली. निष्क्रिय वाहनांची दुरुस्ती केल्याचे भासवत देयके अदा करण्यात आली व नव्या वाहनांवर मिळालेली रक्कम खर्च करून हा घोटाळा करण्यात आला होता.

ज्या अधिका-या च्या कार्यकाळात हा घोटाळा झाला, त्याच्याकडेच याची चौकशी दिल्याने आक्षेप घेण्यात आला होता. चौकशी करणारे कार्यकारी अभियंता राजेन्द्र काळे यांच्याच कार्यकाळात हा घोटाळा झाला. याकडे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता अ. प्र. कोहिरकर यांचे लक्ष वेधण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, काळे यांच्याकडे ही चौकशी कोणी दिली ते तपासून दोन दिवसांत त्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल. वडिगोद्रीचे कार्यकारी अभियंता एस. एल. कुलकर्णी यांच्याकडे चौकशी सोपवण्यात आली असून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याची सूचना त्यांना करण्यात आल्याचे कांबळे म्हणाले. वाहन दुरुस्तीच्या नावाखाली घोटाळा केल्याचे प्रकरण ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध करताच जलसंपदा विभागात खळबळ उडाली. शरद पवार यांच्या दौ-यांच्या पार्श्वभूमीवर सारवासारव करण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिका-या नी केला.

दक्षता पथकाकडून चौकशीची मागणी केवळ चौकशीचा फार्स करण्याऐवजी हे प्रकरण दक्षता पथकाकडे सोपविण्याच्या मागणीसाठी भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी गोंधळ घातला. सर्वच कार्यालयांत अशा प्रकारचा घोटाळा असून चौकशीच्या नावाखाली परस्परांना वाचविण्याचे प्रयत्न होऊ शकतात. अधीक्षक अभियंताकांबळे यांनी कार्यकारी संचालक ए. बी. सरक पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन या वेळी दिले.