आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवंत मुलींच्या पंखाला बळ, दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनींसाठी \'उडान\' शिष्यवृत्ती योजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थिनींच्या पंखांना बळ देण्यासाठी 'उडान' शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याची घोषणा आज एसकेएफ इंडियाने केली. या योजनेअंतर्गत आर्थिकदृ्ष्ट्या दुर्बल घटकातील पात्र मुलींना उच्च शिक्षणासाठी संपूर्ण आर्थिक मदत करण्यात येणार आहे. इयत्ता 11 वीपासून व्यावसायिक कोर्स पूर्ण होईपर्यंत लागणारा संपूर्ण शैक्षणिक खर्च निवडलेल्या विद्यार्थिनींना देण्यात येणार आहे. 

एसकेएफ ही बेेअरिंग बनवणारी अांतरराष्ट्रीय कंपनी असून आर्थिक दुर्बल आणि गुणवंत विद्यार्थिनींसाठी या वर्षीपासून शिष्यवृत्ती योजना राबवत आहे. सुशिक्षित, आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि स्वतंत्र मुलगी आपल्या उज्ज्वल भविष्याने कुटुंबाची पायाभरणी करू शकते. त्यामुळे पात्र मुलींना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करणे हा उडानचा उद्देश असल्याचे जोशिपुरा यांनी सांगितले.

काय आहे पात्रता....
मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांत ही योजना जून 2017 पासून सुरू करण्यात आली आहे. 2017 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या आणि 85 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असणाऱ्या विद्यार्थिनी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. 

कसा कराल अर्ज....
पात्र उमेदवारांनी 19 जूनपर्यंत औरंगाबाद किंवा लातूर सेंटरशी संपर्क साधावा किंवा scholarship@studentsfuel.org येथे आपले अर्ज पाठवावेत. अधिक माहितीसाठी 7219602048, 7219602046 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे अावाहन एसकेएफच्या वतीने करण्यात आले आहे.