आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीईप्रमाणे प्रवेश नाही; तीन शाळांविरोधात तक्रारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शून्य ते सहा वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या कायद्याप्रमाणे प्रवेश देण्यात आले नसल्याच्या तीन शाळांच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे करण्यात आल्या आहेत. त्यांच्यापैकी होलीक्रॉस शाळेची तपासणी करण्यात आली असून उर्वरित दोन शाळांची तपासणी सोमवार, मंगळवारी करण्यात येणार आहे. तसेच मंगळवारी होणार्‍या सर्व खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीतही या नियमांची अंमलबजावणी करण्यात आली किंवा नाही, याची माहिती घेण्यात येणार आहे.

शिक्षणाचा अधिकार कायद्याप्रमाणे सर्व माध्यमांच्या खासगी शाळांनी प्रवेश र्मयादेच्या 25 टक्के मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि दारिद्रय़ रेषेखालील मुलांना प्रवेश देणे आवश्यक आहे. मात्र शहरातील तीन इंग्रजी शाळांनी त्यानुसार कारवाई केली नाही.