आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : शालेय विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 17 जूनपासून वाळूज परिसरातील सर्व शाळा सुरू झाल्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या जीवघेण्या प्रवासालाही सुरुवात झाली आहे. घरापासून दूर असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोहोचवण्याची जबाबदारी अनेक पालकांनी रिक्षाचालकाच्या खांद्यावर दिली आहे. मात्र, रिक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरश: कोंबले जात असल्याने त्यांचा घर ते शाळा आणि शाळा ते घर हा प्रवास अत्यंत जोखमीचा ठरत आहे.