आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी नियमापेक्षा दप्तर दुप्पट, पहिलीचे दप्तर साडेतीन किलोचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पहिलीत मुलांच्या दप्तराचे ओझे हे दोन किलो आणि आठवीतील मुलांच्या दप्तराचे ओझे ४.२ किलोग्रॅमपेक्षा जास्त असू नये, असे शासनाच्या शकि्षण विभागाच्या समितीने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. त्यानुसार ‘दिव्य मराठी’च्या चमूने गुरुवारी शहरातील मराठी इंग्रजी शाळांत जाऊन थेट मुलांच्या दप्तरांचे वजन केले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या दप्तराचे वजन हे शासनाने ठरवून िदलेल्या वजनापेक्षा दीड ते दोनपट जास्त आढळून आले.
ह्या दप्तरांचे ओझे वाढण्यास पालकांकडून शाळेला, तर शाळेने शासनाच्या नियमांना जबाबदार धरले आहे. परंतु, यात मात्र काेवळ्या बालकांच्या पाठीच्या कण्यावर ताण पडत आहे.
विद्यार्थ्याच्या वजनाच्या १० टक्के वजन हे दप्तराचे असावे, असे शासकीय अहवालात सुचवले आहे. याविषयीचा अहवाल राज्याचे शकि्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधानसभेत मांडला आहे. या समितीने दप्तराचे वजन कमी करण्याविषयीचे ववििध मुद्दे शाळा व्यवस्थापनांना सूचनाही दिल्या आहेत. हे वजन कमी करण्याविषयी मुख्याध्यापकांना प्रबोधन करण्यात आले आहे. मात्र, अशी स्थिती असतानाही शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे हे बालवयातच मुलांच्या पाठीचा कणा मोडून पाठीचे आजार वाढवणारे आहे.
शहरात विद्यार्थ्यांच्या दप्तरांच्या ओझ्याची काय स्थिती आहे? हे तपासण्यासाठी ‘दिव्य मराठी’च्या चमूने थेट मराठी इंग्रजी शाळांना भेट दिली. भेटीत प्रतिनिधी प्रत्येक वर्गातील एक-दोन विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन इलेक्ट्रॉनकि्स काट्यावर करून पाहिले. यात पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन साडेतीन तर आठवीच्या दप्तराचे वजन साडेसात किलो होते. यात मराठी माध्यमांपेक्षा इंग्रजी सीबीएससी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हे दुपटीने असल्याचे आढळून आले आहे.

ओझे कमी करण्यासाठी हे उपाय
ला.ना.हायस्कूल,देवकर विद्यालय, ए.टी.झांबरे विद्यालय, भगीरथ विद्यालयाने पहिली ते चौथीपर्यंतचे हे ओझे कमी करण्यासाठी स्वाध्याय पुस्तकिांसह काही वह्या या शाळेतच ठेवण्याचा उपक्रम सुरू केला आहे; तर ओरिऑन, आर.आर.विद्यालयाने एकच पुस्तक शेअर करण्यासह कार्यानुभव, चित्रकला, संगणक शारीरकि शकि्षणाविषयीची पुस्तके शाळेतच ठेवण्याची योजना सुरू केली आहे. अनेक ठकिाणी लहान विद्यार्थ्यांना एकाच वहीत दुरेघी, चाररेघी असेलेली वही घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पुस्तकांची संख्या कमी व्हावी
नियमित तासकिांशविाय कोणतेही पुस्तक अथवा वह्या आणण्यावर आम्ही बंधने आणली आहेत. वह्या या कमी वजनाच्या निश्चित केल्या आहेत. शासनाने पुस्तकांची संख्या कमी करावी. सुषमाकंची, प्राचार्य ओरिऑन सीबीएसई इंग्लिश स्कूल

पहिलीते चौथीपर्यंत तीन विषयांची पुस्तकेच आणण्यास सांगितले जाते. मुले मात्र शकविण्यांचेही दप्तर घेऊन येतात. स्वाध्याय पुस्तकिा आम्ही शाळेतच ठेवतो. शविाजीसाळुंखे, मुख्याध्यापक, सु.ग.देवकर विद्यालय

मुलांनाशाळेत अनेक प्रकारची पुस्तके आणण्यास सांगितले जातात. एखाद्या वेळेस ते आणले नसल्यास शकि्षा केली जाते. एकनाथपाचपांडे, पालक

शाळेतसर्व तासांच्या पुस्तकांसह वह्यांची मागणी केली जाते. यासह वॉटर बॅग, डबा आदी साहित्यही असते. त्यामुळे वजन वाढते. वही, पुस्तक कमी आणल्यास शकि्षा केली जाते. प्रणवपाटील, विद्यार्थी

शकि्षणमंत्र्यांनीनुकतेच दप्तराचे वजन केले आहे. मात्र, तो काटा सरकारमान्य काटा नाही. स्प्रिंग काट्याने ते केले आहे. इलेक्ट्रॉनकि्स काट्याच्या वजनाने खरे वजन समोर येईल. ते निश्चित वजनापेक्षा दीड ते दोनपट नक्कीच आहे. अनिलसांखला, धनश्री स्केल इलेक्ट्रॉनकि्स

दप्तरांच्याओझ्यांची समस्या फार गंभीर आहे. शासनाने यासंबंधीचा निर्णय घेतला असून त्यांचे पत्रक प्राप्त होताच, ठरवून दिलेल्या वजना इतकेच दप्तर बंधनकारक करण्याच्या सूचना प्रत्येक शाळांना देण्यात येतील. याचे उल्लंघन झाल्यास शाळांवर कारवाई केली जाईल. डी.पी.महाजन,शकि्षणाधकिारी (माध्यमकि)


सर्वेक्षणात शहरातील शाळांमध्ये आढळले दप्तराचे वजन
शाळाइयत्ता विद्यार्थ्याचे नाव स्वत:चे वजन दप्तराचे वजन
- सु.ग.देवकरविद्यालय पहिली रूपाली शिंदे २३ किलो किलो ७८० ग्रॅम
- सु.ग.देवकर विद्यालय दुसरी राजदीप माळी १८ किलो किलो ९५० ग्रॅम
- ला.ना.विद्यालय आठवी प्रसाद ओक ३२ किलो किलो ३५० ग्रॅम
- ओरिऑन इंग्लिश स्कूल सहावी प्रणव जानी ३४ किलो किलो ५४० ग्रॅम
- ए.टी.झांबरे विद्यालय दुसरी दर्शकिा जैस्वाल १४ किलो किलो २५० ग्रॅम
- ओरिऑन इंग्लिश स्कूल सहावी सोहम कुमावत २४ किलो किलो ५४० ग्रॅम
-एटी झांबरे विद्यालयात सातवीच्या वर्गात दप्तराचे वजन केल्यानंतर ते किलो ४४ ग्रॅम भरले.
- ओरियन शाळेतील सहावीच्या विद्यार्थ्याचे दप्तराचे वजन चक्क किलो ५४ ग्रॅम भरले.