आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Book Women Only In Kitchen Actress Shabana Azami

शालेय पुस्तकात स्त्रियांचे स्थान स्वयंपाकघरातच, अभिनेत्री शबाना आझमी यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकार परिषदेत मत मांडताना अभिनेत्री शबाना आझमी, जुही चावला. छाया : दिव्य मराठी
औरंगाबाद - भारतात अजूनही ७० टक्के लोकसंख्या खेडेगावात राहते. परंतु तेथे शिक्षणाची अवस्था खूपच वाईट आहे. मुलींच्या शिक्षणाची तर दुरवस्था झाली आहे. दुर्दैवाने आपल्या शालेय पाठ्यपुस्तकातही स्त्रियांचे पात्र दुय्यमस्थानी असून ही परिस्थिती बदलण्याची गरज ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी व्यक्त केली.

एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्या शहरात आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी त्यांची मते मांडली. त्या म्हणाल्या, देशाच्या प्रगतीत वाटा उचलण्यासाठी शिक्षणालाच महत्त्व दे, त्यातही मुलींना केंद्रस्थानी ठेव, असा सल्ला माझे वडील कैफी आझमी यांनी दिला होता. तो मान्य करत माझ्या मिजवा सोसायटीतर्फे मी आजमगडमध्ये तीन शाळा चालवते. यात गरीब, मागास समाजातील मुली शिकतात. शाळांच्या पुस्तकात बघितले तर आई स्वयंपाकघरात तर वडील कामावर गेल्याचे ठासून सांगितले जाते. यामुळे बालमनावर हेच संस्कार होतात. आई घरातील कामासाठी तर बाबा पैसे कमावण्यासाठी हे बिंबवले जाते. पण जमाना बदलला आहे. आईही कामावर जाते. आपल्या पुस्तकांमध्ये हा बदल दिसायला हवा. समाजातील सर्व मूल्यांचा आदर करणारे शिक्षणच खरे शिक्षण आहे. यात स्त्री-पुरुष समानता दिसायलाच हवी.

अंकुर निर्माण होईल
कोणताहीबदल एका रात्रीतून घडत नाही. गांधींवरील चित्रपट पाहून कोणी लगेच गांधीवादी होत नाही. आमचा चित्रपट जरी शिक्षणव्यवस्थेवर प्रकाश टाकणारा असला तरी यातून लगेच परिवर्तन होईल, असे सांगता येणार नाही.

शिक्षकांचा पडतो विसर
शिक्षणामुळे माणूस मोठा होतो. नोकरी, व्यवसाय करतो. पण ज्या शिक्षकामुळे आपण या जागेवर पोहोचलो, त्यालाच आपण विसरतो. शिक्षकाची आठवण काढत नाही. त्या वेळी शिक्षकाचे महत्त्व लक्षात येत नाही. पण आज आठवले तर लक्षात येते की त्यांचे आपल्या आयुष्यात किती योगदान आहे. शिक्षक मात्र आजीवन ज्ञानदानाचे कार्य करत राहतो. या शिक्षकाला आठवणे गरजेचे आहे.