आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाठीमाराविरोधात आज शाळा बंद, ५९ शिक्षकांना अटक; १२ जणांना कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाठीमारात डोके फुटलेला एक मोर्चेकरी. - Divya Marathi
लाठीमारात डोके फुटलेला एक मोर्चेकरी.
पुणे/ औरंगाबाद - औरंगाबाद येथील मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान शिक्षकांच्या मोर्चाला हिंसक वळण लागून लाठीमार झाल्याने शिक्षकांच्या सर्व संघटना एकत्र आल्या आहेत. या प्रकाराच्या निषेधार्थ गुरुवारी राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याचे मुख्याध्यापक महासंघाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी सांगितले. दरम्यान, मुख्याध्यापक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मारुती खेडकर यांनी बंदला पाठिंबा जाहीर केला अाहे.

कायम विनाअनुदानित शाळांना अनुदानाच्या जाचक अटी ठेवल्याच्या निषेधार्थ विनाअनुदानित शिक्षकांनी औरंगाबादेत आंदोलन केले होते.

मोर्चावर लाठीमार झाला होता. शिक्षक एकजुटीची ताकद दाखवण्यासाठी हा बंद पुकारल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मोर्चेकऱ्यांच्या दगडफेकीत ९ पोलिस जखमी झाले. त्याबद्दल गुन्हा दाखल करून ५९ शिक्षकांना अटक करण्यात आली. त्यातील १२ जणांना पोलिस कोठडी देण्यात आली असून ४७ जणांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...