आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय पोषण आहारासाठी मिळाले अडीच कोटी कमी,प्रशासनाला पडला प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या शालेय पोषण आहाराकरिता (धान्यादी) शासनाकडून निधी मिळतो. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये केंद्र राज्य अशा दोघांच्याही वाट्यातून जवळपास कोटी ६३ लाख रुपये कमी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.यामुळे शाळांना निधी कसा वितरित करावा, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. 
 
पहिली ते पाचवीकरिता केंद्र शासनाकडून ४५ दिवसांचा कोटी ४७ लाख ७३ हजार रुपये निधी येणे आवश्यक होते. मात्र ६० लाख रुपये कमी आले आहेत. राज्य शासनाच्या हिस्यातून इयत्ता ली ते वी करिता ९८ लाख १५ हजार रुपये निधी मिळणे आवश्यक असताना ४० लाख रुपये निधी कमी आला. इयत्ता ते साठी केंद्रीय हिस्यातून कोटी ४९ लाख ७१ हजार रुपये येणे आवश्यक असताना, कोटी लाख १९ हजार रुपये कमी आले आहेत. 
 
राज्याच्या हिस्यातील या इयत्तांकरीता ९९ लाख ८० हजार रुपये मिळणे आवश्यक असताना ६० लाख रुपये कमी प्राप्त झाले आहेत. कमी रक्कम मिळाल्याने ती शाळांना कशी वाटप करावी, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. शालेय पोषण आहाराचे लेखाधिकारी राजेंद्रकुमार खाजेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी शालेय पोषण आहाराचा निधी कमी आल्याचे कबूल केले. यासाठी पत्रव्यवहार करण्यात येत असून उर्वरित निधी प्राप्त झाल्यानंतरच शाळांना तो वाटप केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...