आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचोडमध्ये शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोड - परिसरातील दावरवाडी वस्तीतील एका अल्पवयीन मुलीने बुधवारी दुपारी 12 वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. निकिता राजू वाघ (13) असे मृत मुलीचे नाव आहे. निकिताचे आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. निकिता सातवी इयत्तेत शिकत होती.

बुधवारी घरी कोणी नसल्याचे बघून निकिताने छतावरील अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.घटनेनंतर वडील घरी आल्यानंतर निकिता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. वडिलांनी निकिताला खाली काढले; परंतु तोपर्यंत निकिताचा मृत्यू झाला होता. पोलिस पाटील दिनकर एडके यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना याबाबत माहिती दिली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.

आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही. याबाबत पाचोड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार काशीनाथ लुटे करत आहेत.