आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्यूशनला जाणाऱ्या विद्यार्थिनीला व्हॅनमधून ओढून धमकावले, आरोपीला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ट्यूशनला व्हॅनमधून जाणाऱ्या दहावीच्या मुलीला बाहेर ओढत धमकावल्याची घटना गारखेड्यात १३ जुलै रोजी दुपारी घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपी मंगेश जाधव (१९, रा. गारखेडा) याला अटक केली. मंगेशला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
 
पंधरावर्षीय मुलगी नेहमीप्रमाणे दुपारी व्हॅनमधून ट्यूशनला निघाली होती. या दरम्यान मंगेशने तिचा पाठलाग करून व्हॅनसमोर दुचाकी अाडवी लावली. व्हॅनचालकाने मंगेशला विचारणा केली असता मंगशने त्यालाही धमकी दिली. आत बसलेल्या मुलीला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध करताच तिच्याशी झटापट करून धमकी दिली.
 
बातम्या आणखी आहेत...