आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन शाळांच्या दुरुस्तीसाठी 13 लाख मंजूर,शिक्षकांची संख्या वाढवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मनपाच्या दोन शाळांच्या दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाने 13 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. इतर शाळांचीही दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर शिक्षकांची संख्या वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे. ‘मनपा शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा’ या मथळ्याखाली डीबी स्टारने वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रभारी आयुक्तांनी दखल घेत शिक्षणाधिकार्‍यांकडून अहवाल मागवला आहे.

बाकड्यांचा अभाव, धोकादायक इमारती, क्रीडांगणे नाहीत, प्यायला पाणी नाही की शिकवायला शिक्षकही नाहीत, ही परिस्थिती मनपाच्या शहरातील बहुतांश शाळांची आहे. या शाळांची दुर्दशा डीबी स्टारने मांडल्यानंतर प्रभारी आयुक्तांनी शिक्षणाधिकार्‍यांना तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शिक्षणाधिकार्‍यांनी शहरातील सर्व शाळांना भेट दिली. तसेच 2 जुलै रोजी शिक्षणाधिकारी कार्यालयात सर्व केंद्रप्रमुखांची बैठक घेण्यात आली. शाळांची दुरुस्ती करा, विद्यार्थिसंख्या वाढवा, जिथे शिक्षकांची गरज आहे तिथे शिक्षक नियुक्त करा, असे आदेश या वेळी देण्यात आले.

डीबी स्टारने वृत्त प्रकाशित केल्यानंतर मनपा स्तरावर बर्‍याच हालचाली झाल्या. शिक्षणाधिकार्‍यांनीही शाळांच्या अनुषंगाने विविध आदेश काढले.

दररोज तीन शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश.
> भावसिंगपुरा, पडेगाव, नारेगाव शाळेला शिक्षक मिळणार.
> केंद्रांतर्गत व्यवस्था करून शिक्षक उपलब्ध के ले.
> 50 लाखांचा निधी रंगरंगोटी व दुरुस्तीसाठी केला जाणार.
> देखभाल-दुरुस्तीसाठी सर्व शिक्षा अभियान कक्षाला तत्काळ पत्र देणार.
> सावित्रीबाई फुले गणवेश योजना तातडीने राबवणार.
> विद्यार्थी उपस्थिती भत्ता दोन रुपयांवरून तीन रुपये करणार.