आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"स्कूल मॅपिंग'मध्ये शहरातील शाळा मागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गुगलमॅपवर शाळांचे स्थान निश्चित करण्यासाठी शासनाने मोबाइलवर विशेष स्कूल मॅपिंग अ‍ॅप तयार केले आहे. या मॅपवर गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील हजार ९०३ पैकी २५६२ शाळांची नोंद करण्यात आली आहे. यातील बहुतांश शाळा ग्रामीण भागातील असून शहरातील शाळा पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. मुख्याध्यापकांनी लवकरात लवकर मॅपिंग पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

शाळांची माहिती आणि स्थान निश्चित करण्यासाठी अँड्राॅइड मोबाइलवर गुगल स्कूल मॅप अ‍ॅप डाऊनलोड करून शाळेच्या छतावर अथवा प्रांगणात उभे राहून जीपीएस यंत्रणा सुरू केल्यास, शिक्षण विभागाकडून मिळालेला युडायस नंबर विचारल्यानंतर त्यात टाकल्यास शाळेची माहिती आपोआप त्या अ‍ॅपवर नोंदवली जाणार आहे. याबाबत शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी सोमवारी बैठक घेऊन मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मुख्याध्यापकांनी कामही सुरू केले; पण शहरातील शाळांनी यात जास्त रस घेतला नाही. त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या शाळांची माहिती आणि स्थान निश्चित करण्यात अडचणी येत आहेत.
शहरी शाळा मागे
शहरात८५० शाळा असून त्यापैकी केवळ २३५ शाळांचे मॅपिंग करण्यात आले आहे. ६२१ शाळा अद्यापही गुगल स्कूल मॅपिंगवर आलेल्या नाहीत. शाळांच्या प्रमाणात ही टक्केवारी केवळ २८ टक्के आहे.
भविष्यातील फायदा
गुगलमॅपवर या शाळा आल्यानंतर शासनाला भविष्यात नवीन शाळा मंजूर करायच्या असल्यास शाळेचे ऑनलाइन स्थान निश्चित असल्याने कोणत्या माध्यमाची शाळा कुठे देणे अपेक्षित आहे, याची माहिती शासनाला काही क्षणातच कळू शकते. त्यामुळे प्रशासनासह शासनाचाही वेळ वाचून माहिती सहज मिळू शकते.
तालुकानिहाय आकडेवारी
औरंगाबादतालुक्यातील एकूण शाळा-४२३, मॅपिंग पूर्ण ३९६, २७ शाळांचे मॅपिंग बाकी, गंगापूर तालुक्यातील शाळा ४०५, २५३ मॅपिंग पूर्ण, १५२ शाळांचे मॅपिंग बाकी, कन्नड तालुक्यातील शाळा-४३६, २९६ मॅपिंग पूर्ण, १४० शाळांचे मॅपिंग बाकी, खुलताबाद तालुक्यातील शाळा-१६६, १२१ शाळांचे मॅपिंग पूर्ण, ४५ शाळांचे मॅपिंग बाकी, पैठण तालुक्यातील शाळा-३५४, ३१४ शाळांचे मॅपिंग पूर्ण, ४० शाळांचे मॅपिंग बाकी, फुलंब्री तालुक्यातील शाळा-२५५, २३२ शाळांचे मॅपिंग पूर्ण, २३ शाळांचे मॅपिंग बाकी, सिल्लोड तालुक्यातील शाळा-४५२, ३९६ चे मॅपिंग पूर्ण, ५६ शाळांचे मॅपिंग बाकी, सोयगाव तालुक्यातील शाळा-१३६, १०६ शाळांचे मॅपिंग पूर्ण, ३० शाळा बाकी, वैजापूर तालुक्यातील शाळा -४२६, २१३ शाळांचे मॅपिंग पूर्ण ,२१३ शाळांचे मॅपिंग बाकी, शहरातील शाळा-८५०, २३५ शाळांचे मॅपिंग पूर्ण ६२१ शाळांचे मॅपिंग बाकी.