आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन महिन्यांत शालेय मिनी बँकेत ४७ हजार रुपये जमा, माहितीसाठी इतर शाळा सरसावल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- एकीकडे दुष्काळात मराठवाड्यात परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. तर तालुकास्तरावरील पतसंस्था अवसायनात निघत असताना कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथे जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांच्या संचयनी बँकेत तीन महिन्यात दिड लाखांची उलाढाल झाली आहे. एकूणच दुष्काळातही ही शालेय बँक बचतीमुळे विद्यार्थ्यांसाठी फायद्याची ठरली आहे.

कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चिकलठाण हायस्कूल येथे सुरू करण्यात आलेली विद्यार्थी मिनी बँक (संचयनी ) विद्यार्थ्यांना फलदायी ठरत असून दुष्काळातही तीन महिन्यांत सुमारे ४७ हजारांची उलाढाल या संचयनी बँकेत झाली आहे. या संचयनीच्या सभासद विद्यार्थ्यांची संख्या १६५ वरून २२५ पर्यंत वाढली आहे. संचयनीच्या उद््घाटनाच्या दिवशीच बँकेत एक लाखाची रक्कम जमा झाली होती. आजमितीस बँकेत दीड लाख रुपये विद्यार्थ्यांनी जमा केले आहेत. सभासद विद्यार्थी यांनी बँकेत रक्कम भरली किंवा काढली, तर पालकांच्या मोबाइलवर थेट एसएमएस जातो हे विशेष.

अशा प्रकारची संचयनी सुरू करणारी ही कन्नड तालुक्यातील पहिलीच शाळा ठरली आहे. ग्रामीण भागातील शाळा असून दुष्काळाच्या परिस्थितीत मिनी बँक विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडत आहे. या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणारे सर्वच पाल्य शेतकरी, कामगारांचे असून संचयनीच्या माध्यमातून त्यांना बचतीचे धडे मिळत आहेत. बँकेचे कामकाज कसे चालते हेदेखील विद्यार्थिदशेत कळत आहे.

बचतीचायोग्य विनियोग : विद्यार्थीबचत बँकेत जमा झालेल्या रकमेतून विद्यार्थी शालेय साहित्य वही, पेन, खरेदी करण्यासाठी, तर परीक्षा शुल्कासाठीही वापर करत आहेत. सहलीसाठी ही रक्कम कामी आली पैसे जमा करणे, भरणेे, काढणे, पासबुक अद्ययावत करून जमा-खर्चाचा तपशील बघणे आदी सर्व व्यवहार विद्यार्थी स्वतः करतात. शाळेतील शिक्षक सुनील आदिक यांच्या संकल्पनेतून या संचयनीची निर्मिती झाली आहे. रामेश्वरराठोड, मुख्याध्यापक
बातम्या आणखी आहेत...