आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यभरातील शाळाबाह्य मुलांचे जुलैला सर्वेक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्यातील शाळाबाह्य बालकांचे येत्या जुलै रोजी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आतापर्यंत अधिकाऱ्यांच्या माहितीवर आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय व्यवस्थापन समितीने सादर केलेल्या अहवालावरच शाळाबाह्य बालकांची नोंद करण्यात आली आहे.
शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी समितीच्या सर्वेक्षणात, राज्यात लाख तर औरंगाबाद शहरात साडेपाच हजार मुले शाळाबाह्य आढळून आली. दुसरीकडे, २००५ मधील ग्रामीण भागाच्या सर्वेक्षणात साडेपाच लाख विद्यार्थी शाळाबाह्य आढळून आले होते. नव्या शासन निर्णयानुसार, जुलै रोजी शाळाबाह्य बालकांच्या नोंदी घरोघरी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजार आदी ठिकाणी केल्या जातील. यासाठी महसूल, ग्रामविकास, विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागासह राज्यभरातील लाख शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे.
पटावर नोंद, पण शाळेत नाही
- २००५ नंतर स्वतंत्र असा सर्व्हे झाला नाही. आमच्या समितीने मागे एक सर्व्हे केला होता. त्यात तर लाख शाळाबाह्य मुले आढळून आली. त्याचा अहवाल मात्र पुढे सरकला नाही. आता जुलैमध्ये म्हणजे मुले शाळेत येतात त्या वेळी सर्व्हे होत आहे. त्यांच्या स्थलांतराचा महिना नोव्हेंबर आहे. म्हणजे पटावर एक आणि प्रत्यक्षात वेगळी स्थिती असेल.
हेरंब कुलकर्णी
स्थलांतरितांकडे दुर्लक्ष
- स्थलांतरित मुलांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करावे, असा नियम आहे. मात्र औरंगाबाद जि.प.ने तो पाळलेला नाही. दरवर्षी खरे तर शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे व्हायला हवा. परंतु खरी आकडेवारी आधीही नव्हती अन् या सर्व्हेनंतरही अधिकारी देणार नाहीत.
गौतम लांडगे, जनार्थ बालहक्क समन्वय
बातम्या आणखी आहेत...