आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा उभारणीची प्रक्रिया सुरू, एमआयएमच्या पथकाकडून जागांची पाहणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातदाखल होताच घवघवीत यश संपादन करणाऱ्या एमआयएम या पक्षाने हैदराबादप्रमाणेच शहरातही सामाजिक कार्य सुरू करण्याचे ठरवले आहे. गरिबांच्या मुलांसाठी खासगी शाळांपेक्षाही चांगल्या शाळा सुरू करण्याचे पक्षाने मागील महिन्यातच जाहीर केले होते. त्याची प्रक्रिया सुरू झाली असून ओवेसी कुटुंबीयांचे सदस्य कुतुब ओवेसी, वास्तुविशारद संतोषकुमार त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी शहरातील पाच जागांची शाळांसाठी पाहणी केली. यामुळे शिवसेनेसह भाजप, काँग्रेस राष्ट्रवादी या स्थानिक या पक्षांमध्ये खळबळ तर उडालीच; पण मनसेच्या नगरसेवकांची चांगलीच धावपळ झाली.

प्रारंभी फक्त राजकारणासाठी हा पक्ष शहरात दाखल झाला. येथे आमदार २५ नगरसेवक मतदारांनी त्यांच्या पदरी घातले. येथे या पक्षाला भविष्यात बरेच काही मिळू शकते, याची कल्पना आल्याने राजकारणाबरोबरच समाजकारण करण्याचे नेत्यांनी ठरवले. मागील महिन्यात नगरसेवक पदाधिकाऱ्यांना हैदराबादला बोलावण्यात आले होते. तेथे पक्षाने चालवलेल्या सामाजिक कार्याची माहिती देण्यात आली.

रुग्णालयासाठी पक्षाने कटकट गेट येथील पालिका रुग्णालयाच्या जागेची मागणी केली होती; परंतु पालकमंत्री रामदास कदम यांनी ती जागा तर दिली नाहीच, उलट त्या रुग्णालयासाठी कोटी रुपये जाहीर केले. पथकाने मिसारवाडी, हर्सूल, हिलाल कॉलनी, गणेश कॉलनी, पडेगाव या ठिकाणी काहींनी उपलब्ध करून दिल्या आहेत.

जागेबाबत खबरदारी घेत आहोत
आमदारइम्तियाज जलील यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी रुग्णालय किंवा किमान ओपीडी सुरू झालेली असेल. जागा पाहण्यापूर्वी कागदपत्रे तपासली जात आहेत. देणारे हात खूप आहेत; परंतु आम्ही विशेष खबरदारी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

...अन् उडाली एकच धावपळ
एमआयएमचेपथक अशा कामासाठी येणार असल्याचे कमी लोकांना माहिती होते. मंगळवारी ते सर्वांनाच माहिती झाले. हे पथक नगरसेवकांच्या भेटीगाठी घेणार आहे तसेच मार्गदर्शन करणार असल्याची वार्ता पसरल्याने अनेकांची धावपळ झाली, तर दुसरीकडे शिवसेना भाजपने याची धास्ती घेतली.