आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजाननिमित्त शाळा सकाळी भरणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्याला १९ जूनपासून प्रारंभ होणार आहे. रमजाननिमित्त शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जि. प. शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळांसह सकाळी ते आणि दुपारी १२ नंतर भरणाऱ्या खासगी शाळा सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत भरवणार असल्याचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. रमजान महिन्यात विद्यार्थी आणि शिक्षकांना उपवासकाळात (रोजा) त्रास होऊ नये यासाठी शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. मात्र शाळांच्या तासिकेत कोणत्याही प्रकारचा बदल होणार नसून आरटीईनुसारच सगळ्या तासिका होणार आहेत.