आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षांनी वाजली देवळाईच्या म्हाडा कॉलनीत शाळेची घंटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या देवळाई वॉर्डातील म्हाडा कॉलनीच्या मागे परिसरात ५५ मुले शाळाबाह्य आढळून आली होती. येथे अंगणवाडी वगळता शाळाच नव्हती. शाळाबाह्य मुलांचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध करताच मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया शिक्षणाधिकारी रवींद्र निकम यांनी दखल घेत बुधवारपासून (३ ऑगस्ट) शाळा सुरू करण्याचे आदेश दिले अन् दहा वर्षांत पहिल्यांदाच या भागात सकाळी शाळेची घंटा वाजली.
देवळाई वॉर्डात अनेक समस्या असून मनपाकडून ते सोडवण्यासाठी पाऊल उचलण्यात येत आहे. नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे यांनी मनपाला पत्र देऊन म्हाडा कॉलनी परिसरात शाळा सुरू करण्याची मागणी केली होती. एक महिना उलटूनही त्यावर काहीच निर्णय झाला नव्हता. याविषयी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने शाळा इमारत आणि वस्तीची पाहणी केली होती. त्यानंतर तसे वृत्तही प्रसिद्ध केले. याची दखल घेत बकोरिया यांनी माझ्या परवानगीची वाट पाहता थेट शाळा सुरू करा, असे आदेश निकम यांना दिले. त्यानुसार बुधवारी शाळा सुरू झाली. हिवाळे यांनी इस्कॉनने मुलांना आणलेले लाडू वाटून शाळेचा पहिला दिवस साजरा केला. या वेळी केंद्रीय मुख्याध्यापक संजीव सोनार, शशिकांत उबाळे, राधिका राजपूत, कामिनी घोरपडे, चैनसिंग जारवाल, ताराचंद राजपूत आदींची उपस्थिती होती.

पहिल्याच दिवशी लाडू खिचडी : शाळेच्यापहिल्याच दिवशी मुलांना इस्कॉनची तुपाची खिचडी लाडूची मेजवानी मिळाली. पहिल्याच दिवशी शाळेत ३० मुलांची उपस्थिती होती. येथे मनपाने शिक्षिकेचीही नियुक्ती केली. मुलांची संख्या वाढल्यास येथे आणखी एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.

‘दिव्य मराठी’च्या वृत्ताचा परिणाम
^या भागात एवढी मुले शाळाबाह्य असल्याचा प्रकार आम्हाला सुरुवातीला लक्षात आला नव्हता. मात्र, ‘दिव्य मराठी’च्या वृत्तामुळे माहिती समोर आली. त्यामुळे शाळा सुरू होणे हा ‘दिव्य मराठी’च्या वृत्ताचा परिणाम आहे. महापौरांची वेळ घेऊन लवकरच शाळेचे उद््घाटन करण्यात येईल. -रवींद्र निकम, प्रभारी शिक्षणाधिकारी

शुक्रवार २९ जुलै सोमवार ऑगस्ट
^ बातमीप्रसिद्ध होताच प्रशासन कामाला लागले. त्यानंतर मी आयुक्तांना भेटलो. शाळा सुरू झाल्याने मुलांना फायदा झाला आहे. -अप्पासाहेब हिवाळे, नगरसेवक, देवळाई.
बातम्या आणखी आहेत...