आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यू-डायस क्रमांक नसणाऱ्या राज्यातील शाळांची मान्यता रद्द होणार, 15 सप्टेंबरपर्यंतची डेडलाइन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ज्या शाळांनी अद्याप ऑनलाइन पद्ध्तीने नोंदणी केलेली नाही. तसेच  यु-डाईस क्रमांक घेतलेला नाही. अशा शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.
अनेक शाळा अशा आहेत.ज्या शासनाचे आणि शिक्षण विभागाचे कोणतेही नियम पाळत नाहीत. तसेच विद्यार्थी संख्या,तज्ज्ञ आणि पात्रता धारक शिक्षक शिकवण्यासाठी आहेत की नाही, शाळेत सुविधांबाबतची माहिती लपवतात. त्यामुळे अशा शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच सर्व शाळांची माहिती एकाच छताखाली आणण्यासाठी सर्व सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने सर्व शाळांना युडाईस क्रमांक असणे बंधनकारक केले होते. तसेच ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करायची होती. असे असतांनाही अनेकशाळा आज अवैधरित्या चालू आहे. अशा अवैधरित्या अनधिकृतपणे चालू असणाऱ्या शाळांचे पितळ उघडे करण्यासाठी राज्यातील सर्व व्यवस्थापन, माध्यम आणि अभ्यासक्रमाच्या इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळांना युडाईस क्रमांक असणे अनिवार्य आहे. तथापि अद्यापही शाळांनी यु - डाईस क्रमांक प्राप्त करुन घेतलेले नाहीत. अशा शाळांनी www.student.udise.in  या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करुन यु - डाईस क्रमांक प्राप्त घेणे बंधनकारक राहणार आहे. यासाठी मोबाई अॅपद्वारेही नोंदणी करुन यु डाईस क्रमांक प्राप्त करुन घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. जी शाळा १५ सप्टेंबर अखेरपर्यंत यु - डाईस क्रमांक प्राप्त  करुन घेणार नाही. अशा शाळेची मान्यता काढण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...