आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपुर्‍या तयारीतच उरकला विभागीय विज्ञान मेळावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शालेय विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्ती वाढीस लागावी यासाठी दरवर्षी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात येते, परंतु शिक्षण विभागाने मेळाव्याबाबतची सूचना ऐनवेळी दिल्याने विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळच मिळाला नाही. विभागीय मेळाव्यात प्रभावी सादरीकरण करता न आल्याने सहभागी विद्यार्थ्यांनी खंत व्यक्त केली.

तालुकास्तरावरील विज्ञान मेळाव्यात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर व तेथे चांगले प्रदर्शन करणाऱ्यांची विभागीय स्तरावर निवड होते. दरवर्षी विभागीय मेळाव्यासाठी दहा विद्यार्थी निवडले जातात. त्यातील दोघांना राज्य मेळाव्यासाठी संधी िमळते. यंदाचा विभागीय मेळावा शहरातील उस्मानपुरा येथील िशशू विकास शाळेत असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक विभागाने त्या त्या िजल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवली होती, परंतु बहुतेक िठकाणच्या शिक्षणाधिकार्‍यांनी आदल्या िदवशी म्हणजे १९ ऑगस्टला संबंिधत शाळांना मेळाव्याबाबत माहिती िदली.
काही शाळांना तर आमंत्रणदेखील िमळाले नाही. त्यामुळे परभणी िजल्ह्यातील दोन विद्यार्थी या मेळाव्याला मुकले, तर औरंगाबाद, हिंगोली, बीड,जालना येथून आठ विद्यार्थी सहभागी झाले होते. पण त्यांना अपुऱ्या तयारीमुळे उत्कृष्ट सादरीकरण करता आले नाही. विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी शिक्षकांनाही वेळ मिळाला नाही. शालेय शिक्षणमंत्र्यांच्या विभागामध्येच असा प्रकार घडत असल्याने शिक्षण विभागाच्या बेजबाबदारपणाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
ऐनवेळी सादरीकरणाने गोची
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर व िशक्षण विभाग यांच्या संयुक्त िवद्यमाने घेण्यात आलेल्या विभागीय विज्ञान मेळाव्यात "सतत भविष्यासाठी कृषी क्षेत्रात नवप्रर्वतन : अपेक्षा व आव्हाने' या विषयावर विद्यार्थ्यांना सादरीकरण करायचे होते, परंतु बहुतांश शाळेतील विद्यार्थ्यांना मेळाव्याच्या आदल्या िदवशी माहिती मिळाली. त्यामुळे तयारीसाठी वेळच मिळाला नाही, अशी खंत शहरातील एका शाळेतील विद्यार्थनिीने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली.

बीड आणि हिंगोलीच्या विद्यार्थ्यांची निवड
विभागीय मेळाव्यासाठी दहा विद्यार्थी उपस्थित राहणे अपेक्षित होते, परंतु परभणी जिल्ह्यातील दोन विद्यार्थी अनुपस्थित राहिले. आठ विद्यार्थ्यांपैकी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वसंत विद्यालयाचा विद्यार्थी दीपक शिरसाट व िहंगोलीच्या एस. बी. आर्य कन्या विद्यालयाची पल्लवी जाधव या दोघांची राज्यस्तरीय मेळाव्यासाठी निवड झाली.