आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठात उभारले जाणार अत्याधुनिक सायन्स पार्क

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या सायन्स पार्क उभारणीला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 6 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे लवकरच विद्यापीठात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज सायन्स पार्कच्या उभारणीला सुरुवात होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बेंगळुरू, कोलकाता येथील व इतर राज्यांतील महानगरांप्रमाणे विद्यापीठातही सायन्स पार्क उभारण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. त्यासंबंधीचा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी मंजूर केला. पहिल्या टप्प्यातील 6 कोटी रुपये मंजूरही झाले असल्याची माहिती बीसीयूडीचे संचालक डॉ. भागवत कटारे यांनी दिली.

सायन्स पार्क नेमके कोणत्या ठिकाणी उभारायचे याची जागा अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र, केंद्र सरकारकडून येणारा निधी मंजूर झाल्यानंतर लगेचच जागा निश्चित केली जाणार आहे. यासाठी जवळपास 11 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 6 कोटी राज्य सरकारने मंजूर केले असून उर्वरित केंद्र सरकारकडून मिळणे अपेक्षित आहे.
भारतीय विद्यार्थी अमेरिकेत सायन्स टॅलेंटमध्ये अव्वल