आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्यापासून ‘यमदूतां’ची कत्तल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरात धावणार्‍या सुमारे पाच हजार भंगार रिक्षांचे कटरद्वारे तुकडे करण्यात येणार आहेत.‘दिव्य मराठी’ ने शनिवारच्या अंकात ‘5 हजार भंगार यमदूत रस्त्यांवर’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची गंभीर दखल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतली आहे. सोमवारपासून परमीट उतरवण्यासाठी आलेल्या जुनाट रिक्षांचे तुकडे करून भंगारमध्ये टाकण्यात येणार असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिलकुमार बस्ते यांनी शनिवारी दिली.

‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात कालबाह्य आणि भंगार ठरवलेल्या रिक्षा कशा पद्धतीने शहरात निर्धास्तपणे धावत आहेत, याचा साद्यंत तपशील दिला होता. त्यामुळे प्रवाशांच्या जीवनाशी खेळ चालला असून याकडे आरटीओ आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचेही अधोरेखित करण्यात आले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेऊन आरटीओ कार्यालयाने ही कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या भंगार रिक्षा ‘बाद’ झाल्याच पाहिजेत
खरं तर 10 वर्षेच कोणतेही वाहन चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकते. त्यानंतर वाहनाच्या इंजिनमधून इंधन अर्धवट जळण्यास सुरुवात होते आणि वातावरणात प्रचंड प्रदूषण होण्यास सुरुवात होते. वाय. एस. ठाकूर, पोलिस निरीक्षक, मोटार वाहतूक शाखा

खासगी वापराच्या तुलनेत प्रवासी वाहनांचे मेंटेनन्स खूप असते. साधारणत: 15 वर्षांनंतर या वाहनांची बॉडी कमकुवत होऊन अपघात होण्याचे प्रमाण अधिक असते. डॉ. संतोष भोसले, प्राध्यापक, एमआयटी कॉलेज

भंगार आणि कालबाह्य रिक्षांची बॉडी, चेसिस सडलेली असते. ही वाहने थोडीही आपटली तर चेसिस तुटण्याची भीती असते. तसेच मेंटेनन्सही खूप असतो. समीर पठाण, रिक्षा मेकॅनिक, रामनगर

जुनाट रिक्षांची चेसिस, बॉडी कमकुवत झालेली असते. इंजिनसह इतर यंत्रणाही योग्य प्रकारे काम करत नाही. वेल्डिंग करून-करून रिक्षा चालवल्या जात असल्याने नेहमी अपघाताचा धोका असतो. शेख नईम, रिक्षा मेकॅनिक, सेव्हन हिल्स

परमीट उतरवल्यावरही रिक्षा चालवणार्‍यांनी रिक्षा भंगारात टाकाव्यात. अन्यथा अशा रिक्षांचे आरटीओ तुकडे करून भंगारमध्ये टाकेल तसेच संबंधित व्यक्तीच्या विरोधात फसवणूक प्रकरणी फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येईल. अनिलकुमार बस्ते, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी
5 हजार भंगार ‘यमदूत’ रस्त्यांवर
औरंगाबादेत रस्त्यारस्त्यावर उभे आहेत यमदूत!