आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या लेखकाचे संवाद बड्या कलाकारांच्या तोंडी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - येड्यांची जत्रा, फोर इडियट्स, सुपरस्टार या चित्रपटांनंतर औरंगाबादचा तरुण कलाकार प्रकाश भागवत याने संवाद लिखाण केलेला आयपीएल (इंडियन प्रेमाचा लफडा) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याने लिहिलेल्या संवादाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. विशेष म्हणजे औरंगाबादच्या या तरुण संवादलेखकाने लिहिलेले संवाद आतापर्यंत भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, विनय आपटे, माेहन जोशी अशा दिग्गज कलाकारांच्या तोंडून प्रेक्षकांनी ऐकले आहेत.

लहानपणी ऑर्केस्ट्रा आणि जत्रेतील नाटकातून काम करत प्रकाशने झी मराठी या वाहिनीवरील हास्यसम्राट या मालिकेत भाग घेऊन मराठवाड्याचा पहिला हास्यसम्राट होण्याचा मान मिळवला. येड्यांची जत्रा या मराठी सिनेमाला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट हा पुरस्कारही मिळला. पुढील दोन महिन्यांत त्याचे गंमत आणि ढोलकी हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "आयपीएल' या सिनेमात विजय पाटकर, विजय चव्हाण, स्वप्निल जोशी या कलाकारांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. दिग्दर्शन दीपक कदम यांनी केले आहे. प्रकाश हा मूळचा सिल्लोड तालुक्यातील असून औरंगाबाद येथील विवेकानंद महाविद्यालयात त्याचे शिक्षण झाले आहे.