आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारभाऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तब, अब्दीमंडीत पहिल्यांदाच मुस्लिम महिलेला मान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सरपंच आणि उपसरपंचांच्या निवडी पार पडल्यामुळे गावागावांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होताच सरपंचपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचीच चर्चा प्रत्येक गावात सुरू होती. शुक्रवारी पंढरपूरसह पाटोदा, वळदगाव आणि अब्दीमंडीतील सरपंच, उपसपंचांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. नावे जाहीर होताच गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नूतन पदाधिकाऱ्यांची गावातून विजयी मिरवणूकही काढण्यात आली.
दौलताबाद - अब्दीमंडीच्यासरपंच, उपसरपंचांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. यंदा पहिल्यांदाच मुस्लिम महिलेला सरपंचपदाचा मान मिळाला. सरपंचपदी शाहिन बेगम अब्दुल हमीद, तर उपसरपंचपदी शेख वहिद शेख अजीम यांची बिनविरोध निवड झाली. सरपंचपदाचा मान महिलेला मिळाल्यामुळे अब्दीमंडी गावातील आठ दिवसांत जन्मणाऱ्या मुलीची जिलेबी तुला करण्याचा संकल्प ग्रामपंचायत सदस्य जहांगीर पठाण यांनी जाहीर केला. निवडणूक अधिकारी म्हणून बी. आर. खेडकर, एस. आर. बनकर, तलाठी शेळके यांनी काम पाहिले. ग्रामपंचायत सदस्य ताराबाई सदावर्ते मंदाबाई शेळके, रीहानाबी शेख सिराज, शोभाबाई ढगारे,राजू बस्वराज लिंगे, इस्माइल पठाण, अजमत, पठाण, जहांगीर पठाण माजी सरपंच मनोज पारधी, बाळकृष्ण विखणकर, बी. के. पठाण, दौलताबादचे सरपंच सय्यद अतिक, हारुणभाई गुलाब बळी, शिवनाथ अप्पा चौधरी, दौलतसिंग हजारी, रूपेश सदावर्ते, दगडू अप्पा चिनुके, नारायण लिंभारे, हमीद भाई, इब्राहिम पठाण आदींनी पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
वाळूज पंढरपूरच्यासरपंचपदी गौतम चोपडा, तर उपसरपंचपदी महेंद्र खोतकर यांची निवड झाली. या दोघांची नावे जाहीर झाल्यामुळे ‘दिव्य मराठी’ने १० सप्टेंबरच्या अंकात केलेले भाकीत खरे ठरले.

या ग्रामपंचायतीत १७ सदस्य असून सर्वसाधारण पुरुषांसाठी सरपंचपद राखीव होते. त्यासाठी गौतम चोपडा मेहबूब चौधरी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. उपसरपंचपदासाठी महेंद्र खोतकर अप्पासाहेब साळे हे दोघे रिंगणात होते. या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. त्यात सरपंचपदासाठी चोपडा यांना १०, तर त्यांचे प्रतिस्पर्धी चौधरी यांना सात मते मिळाली. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत खोतकर यांना १० मते पडली. सातच मते मिळाल्याने प्रतिस्पर्धी उमेदवार साळे पराभूत झाले.

निवडणूक निर्णय अधिकारीपदी एच. आर. सोनवणे होते. त्यांनी सरपंचपदी चोपडा, तर उपसरपंचपदी खोतकर यांच्या निवडीची घोषणा केली. निवड जाहीर होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात ग्रामपंचायतीपासून मिरवणूक काढण्यात आली. सरपंच चोपडा यांच्या घरासमोर मिरवणूक विसर्जित करण्यात झाली. आमदार संजय सिरसाट, जिल्हा परिषद सदस्य बप्पा दळवी, मुकेश ठाकूर, सुनील साकला, मनीष तोतला, सुनील काळे, राजू ठाकूर, लताबाई कानडे, बाळू राऊत, फारुख शेख, संजय शहाणे, रामचंद्र कसुरे, लखन सलामपुरे, साहेबराव दाभाडे यांच्यासह दोन हजारांवर ग्रामस्थ मिरवणुकीत सहभागी झाले.

पाटोद्यातकल्याण पेरे
संतगाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यभरात ख्याती मिळवलेल्या, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त निर्मल ग्राम पाटोद्याच्या सरपंचपदी कल्याण पाटील पेरे यांची, तर उपसरपंचपदी विष्णू राऊत यांची बिनविरोध निवड झाली. या ग्रामपंचायतीत ११ सदस्य असून सरपंचपद सर्वसाधारण पुरुषासाठी राखीव होते. सरपंच उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सुनीता पेरे पुष्पा पेरे या दोन सदस्या गैरहजर होत्या. कुसुम मातकर, चंदन राजपूत, किशोर पेरे, उज्ज्वला जमधडे, चंद्रकांत पेरे, मीरा पवार, भाग्यवंत उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी एस. डी. देशमुख, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक आर. डी. चौधरी यांनी काम पाहिले. सरपंचपदी कल्याण पेरे उपसरपंचपदी विष्णू राऊत यांची निवड जाहीर होताच फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. माजी सरपंच भास्करराव पाटील पेरे, पोलिस पाटील लहू मुचक यांच्यासह ग्रामस्थांची या वेळी उपस्थिती होती.

वळदगावा राजू घोडके यांच्याहाती राहणार सूत्रे
वळदगावच्यासरपंचपदी राजू घोडके यांची निवड झाली. घोडके यांना सहा, तर प्रतिस्पर्धी विष्णू झळके यांना पाच मते मिळाली. उपसरपंचपदी नारायणसिंग डांगर निवडून आले. त्यांना सहा, तर प्रतिस्पर्धी उमेदवार नूरजहाँ शेख यांना पाच मते मिळाली. सरपंचपद सर्वसाधारण पुरुष गटासाठी राखीव आहे. नावे जाहीर होताच नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचे स्वागत करण्यात आले.

दरम्यान, पंचायत समिती सदस्य गणेश पाटील नवले यांच्या पॅनलने बहुमत मिळवले असल्याने ही ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आली आहे. सीमा पहाडिया, संगीता खोतकर, गुंफाबाई खोतकर, कांताराव नवले, उत्तम खोतकर, सुभद्राबाई साबळे, गयाबाई राऊत यांची उपस्थिती होती. निवडणूक निर्णय अधिकारी एच. एस. काठोते होते. ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

राजू घोडके
पंढरपूरमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. छाया : धनंजय दारुंटे
अब्दीमंडी येथे नवनिर्वाचित सरपंच शाहिन बेगम अब्दुल हमीद, उपसरपंच शेख वहिद शेख अजीम यांचा सत्कार करण्यात आला. छाया : अभय विखणकर