आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गूढ आवाजाचे कारण शोधण्यासाठी भूवैज्ञानिक पैठणमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - पैठण तालुक्यात सहा महिन्यांच्या कालावधीत अनेक वेळा भूगर्भातून गूढ आवाज आले आहेत. १५ जूनला सकाळी ९ वाजेदरम्यानदेखील दोन वेळा प्रचंड आवाज झाला. त्यानंतर पाटबंधारे विभागाने शासनाला या आवाजाचे कारण शोधण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे बुधवारी नागपूर येथील भारतीय भूवैज्ञानिक संशोधन विभागात असलेले वरिष्ठ वैज्ञानिक महेश वर्मा व जयदीप हे पैठणमध्ये त्या गूढ आवाजाचा शोध घेण्यासाठी आले आहेत.
वडवाळीतून खडक, मातीचे परीक्षणासाठी घेतले नमुने महेश वर्मा व जयदीप यांनी आवाज ज्या दिशेने आला त्या भागातील खडक, मातीचे नमुने घेतले. वडवाळी येथील ग्रामस्थांना या आवाजासंदर्भात सविस्तर माहिती विचारली. त्यानंतर जायकवाडी धरण परिसराची पाहणी केली. तसेच जायकवाडीच्या भूकंपमापक केंद्रावरील माहिती घेतली. हे नमुने नागपूरच्या प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. या वेळी नायब तहसीलदार शेट्टीसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.