औरंगाबाद - असईच्या लढाईमुळे इंग्रजांना भारतात ताकद मिळाली आणि ते अधिक शक्तीशाली झाले. या लढाईला नुकतेच 222 वर्षे पूर्ण झालेत. भारतातील इंग्रजानुकूल कलाटणी देणारी ही प्रसिद्ध लढाई औरंगाबादच्या ईशान्येस ७२ किमी वर असणाऱ्या असई या गावी २३ सप्टेंबर १८०३ रोजी झाली. ही मुख्यत्वे इंग्रज विरुद्ध रघूजी भोसले (नागपूरकर) आणि दौलतराव शिंदे, ग्वाल्हेरकर या मातब्बर मराठा सरदारांत झाली. या लढाईत इंग्रजांकडे केवळ ६ हजार सैन्य होते तर मराठ्यांकडे तब्बल ५० हजार. पण, तरीही मराठ्यांचा यात पराभव झाला. ते कसा झाली आणि त्याचा भारतीय राजकाणावर काय प्रभाव पडला याची खास
माहिती divyamarathi.com च्या वाचाकांसाठी...
५० हजार सैनिकांना सहा हजार सैनिकांनी कशी दिली मात
या लढाईत मराठ्यांकडे ५०,००० सैन्य होते.तथापि, त्यातील बेगम समरूच्या दोन पलटणी कुचकामी होत्या आणि इतर मराठा सरदारांचे फारसे साहाय्य मिळाले नाही. इंग्रजांची खडी फौज सुमारे ६,००० होती. मात्र, या लढाईमध्ये इंग्रजांना महाराष्ट्रातीलच पटवर्धन, पाटणकर, निपाणकर, बापू गोखले, पेशवे म्हैसूरकर या मराठी फौजांनीच इंग्रजांना सहकार्य केले. परिणामी, रघुजी राजे भोसलेंजी फौज एकाएकी पडली.
पुढील स्लाइड्सवर वाचा,
-काय होता लढाईचा हेतू
-पहिल्यांदा केला नगरचा किल्ल्यावर हल्ला