आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२१०० रुपयांत मिळेल दुसरे घरगुती सिलिंडर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एक सिलिंडर ज्या ग्राहकांकडे आहे, अशा ग्राहकांना सिलिंडर संपल्यानंतर तत्काळ एजन्सीवरून सिलिंडर हवे असते. मात्र, सिलिंडर उपलब्ध नसल्यास ग्राहकांची अडचण होते. त्यामुळे ग्राहकांना २१०० रूपयांत दुसरे सिलिंडर देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना तीन गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी एजन्सीला दिल्या आहे.

शहरात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन पेट्रोलियम या कंपन्यांकडून गॅस सिलिंडर पुरवण्यात येतात. तिन्ही कंपन्यांच्या १८ एजन्सीज शहरात आहेत. या एजन्सीमध्ये तीन लाख २८ हजार १५७ ग्राहक आहेत. त्यापैकी केवळ एक लाख ग्राहकांकडे डबल सिलिंडर आहेत. उर्वरित दोन लाख २८ हजार १५७ ग्राहकांकडे एकच सिलिंडर आहे. त्यामुळे सिलिंडर संपल्यास त्यांना तत्काळ सिलिंडर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी एजन्सीवर असते. परिणामी, दोन सिलिंडर असलेल्या ग्राहकांची वेटिंग वाढत जाते. अनेकदा ग्राहकांना सिलिंडर नसल्याने अडचण निर्माण होत असते. पर्यायी व्यवस्था करण्यासाठी धावपळ करावी लागते.
ग्राहकांची ही अडचण लक्षात घेऊन कंपनीने सर्वच ग्राहकांनी डबल सिलिंडर घ्यावे, यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. एजन्सीकडूनही ग्राहकांना तशा सूचना देण्यात येत आहेत.
फक्त तीन पुरावे आवश्यक
दुसरे सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांना २१०० रुपये भरावे लागणार आहेत. त्यात १४५० रुपये डिपॉझिट म्हणून, तर इतर रक्कम ही कार्यालयीन कामांसाठी असते. दुसरे सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांना केवळ गॅस सिलिंडर घेतल्याची पावती, पावतीचे झेरॉक्स आणि गॅस पासबुक आवश्यक आहे.

ग्राहकांचा फायदा
दुसरे सिलिंडर घेतल्याने ग्राहकांची होणारी तारांबळ थांबेल. दुसरे सिलिंडर घरात भरलेले असल्याने जेव्हा सिलिंडर संपेल तेव्हा तत्काळ घरात असलेले सिलिंडर लावता येते. ही योजना ग्राहकांच्याच फायद्याची आहे. मंगेश आस्वार, संचालक, मंगेश गॅस एजन्सी