आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Secretary Of Student Parliament Election Issue At Auraangabad

सर्वच महाविद्यालयांत रंगल्या विद्यार्थी संसदेच्या निवडणुका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यातविधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयातील तरुण राजकारण्यांनी मात्र निवडणुकीचा अनुभव घेतला. विद्यार्थी संसद सचिवाच्या या निवडणुकांमुळे सर्वच कॅम्पसला चांगलाच राजकीय रंग आला होता.
या निवडणुकीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, मनविसे, युवा सेना, युवा काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये चुरस होती. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने शहरातील बहुतांश महाविद्यालयांत आपले उमेदवार निवडून आले असल्याचा दावा शहर अध्यक्ष राहुल तायडे यांनी केला आहे. मात्र अनेक महाविद्यालयांतील निवडणुका बनिविरोध झाल्याचे दिसून येते.

अनेक महाविद्यालयांची निवडणूक राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली होती. त्यामुळे राजकीय नेत्यांनी देखील पडद्यामागून सहभाग नोंदवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. निवडून आलेल्या उमेदवारांचे राजकीय व्यासपीठावर जंगी स्वागत देखील करण्यात आले. मिरवणुका देखील काढण्यात आल्या. या माध्यमातून राजकीय पक्षांना विद्यार्थी कार्यकर्ते मिळाल्याची चर्चा आहे.

विद्यापीठाच्या सचविपदावर मात्र भारतीय विद्यार्थी सेनेने वर्चस्व मिळवले.
वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसद सचविपदी गायत्री गिरीची निवड झाल्यानंतर जल्लोष करण्यात आला.

असा आहे विविध महाविद्यालयांतील निकाल
आंबेडकरमराठवाडा विद्यापीठ नामदेव कचरे, भाविसे
वसंतराव नाईक महाविद्यालय गायत्री गिरी राष्ट्रवादी
माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय पदम शिंदे राष्ट्रवादी
शिवछत्रपती महाविद्यालय गणेश िबरुटे राष्ट्रवादी
व्ही उन पाटील लॉ कॉलेज विक्रम पळसीकर राष्ट्रवादी
विवेकानंद महाविद्यालय विठ्ठल हरिभाऊ नागरे राष्ट्रवादी
वाय. बी. चव्हाण फार्मसी कॉलेज सना शेख राष्ट्रवादी
मिलिंद महाविद्यालय अजिंक्य राक्षे राष्ट्रवादी
आंबेडकर महाविद्यालय नंदकुमार तांबे राष्ट्रवादी
जयप्रकाश अध्यापक महाविद्यालय अर्चना तुगडे राष्ट्रवादी
एमजीएम जनसंवाद विभाग गौरव पवार राष्ट्रवादी
हायटेक महाविद्यालय किरण देसाई मनविसे
देवगिरी महाविद्यालय शेखर मोरे फ्रेंड सर्कल

अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व
शहरातीलअनेक महाविद्यालयांत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा झंेडा महाविद्यालयांवर फडवल्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेतेदेखील या वेळी महाविद्यालयात हजर झाले होते. यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राहुल तायडे, विनोद बनकर, संदीप शिरसाट, प्रवीण वाकेकर, राजेंद्र शेजूळ, दत्ता भांगे, महादेव झलक, शशांक ढाकणे, अभिजित गरड, सुनील बडेकर, संतोष बाबळे, विशाल राठोड, बंटी देहाडे, पवन बनकर यांनी प्रयत्न केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन विनोद पाटील, आमदार सतीश चव्हाण यांनी केले आहे.
औरंगाबाद देवगिरीमहाविद्यालयाच्या विद्यार्थी संसद सचविपदी देवगिरी फ्रेंड सर्कलचा उमेदवार शेखर मोरेने विजय मिळवला. शेखरने सर्वाधिक ४६ मते घेतली. निवडणूक अधिकारी म्हणून प्राचार्य डॉ. माणिक जाधव यांनी काम पाहिले. त्याच्या यशाबद्दल बाळासाहेब गायकवाड, सिद्धांत सिरसाट, मनदीप राजपूत, मंगलसिंग धिल्लन, विजय वाहूळ, अरुण बोर्डे, नितीन पवार, विकी गुमलाडू यांनी अभिनंदन केले.