आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Security Atomosapher Necessary For Development Eknath Khadse

विकासासाठी सुरक्षित वातावरणाची गरज, एकनाथ खडसे म्हणाले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विकास करायचा असेल तर आधी सुरक्षित वातावरण असणे आवश्यक आहे. त्यामुळे विकासापेक्षा सर सलामत तो पगडी पचास महत्त्वाचे आहे. युती सरकारचे सर्वोच्च प्राधान्य सुरक्षेला असेल, असे मत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. शनिवारी खडसे यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी शहरात अनेक ठिकाणी रॅली, छोटेखानी सभा घेतल्या.

नितीन चित्ते यांच्या प्रचारार्थ राधेकृष्ण मंगल कार्यालयात त्यांची सभा झाली. या वेळी ते म्हणाले, १९६४ मध्ये या शहरात दंगल झाल्यापासून शहराची शांतता भंग झाली आहे. दंगलीमुळे रेल्वेगाड्या रद्द झाल्या होत्या आणि आपण तीन दिवस स्टेशनवर झोपल्याची आठवण त्यांनी सांगितली. शहरात परगावातून राहण्यासाठी अनेक लोक आलेले आहेत. तणावपूर्ण वातावरणात त्यांची सुरक्षा कोण करू शकतो, हे त्यांना माहिती आहे. युती सरकार शहराच्या विकासाला भरघोस निधी देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

एमआयएमची विचारसरणी घातक : खडसे म्हणाले, शहरातील अँटी अॅक्टिव्हिटी रिपोर्ट नेहमी येतात. ही िचंताजनक बाब आहे. त्यामुळे शहरातील सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. एमआयएमची विचारसरणी अतिशय विघातक आहे. अोवेसींच्या प्रक्षोभक भाषणामुळे समाजातील शांततेचा भंग होत आहे. त्यामुळे आज राजकीय फायदा वाटत असला तरी ही विषवल्ली जागीच ठेचली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

...म्हणून लोक युतीकडे
सध्या काँग्रेस, राष्ट्रवादीला जनता कंटाळली आहे. त्यामुळे लोकांचे आकर्षण युतीकडे आहे. या वर्गात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. समाजातील एक वर्ग या पक्षाला त्रासला आहे. त्यांनी मतदान कोणाला करायचे याची मानसिकता ठरवलेली नाही. मात्र, हा वर्ग एकाच वेळी युतीकडे झुकल्यास बहुमताकडे घेऊन जाणारा असल्याचे खडसे म्हणाले.

बाहेर पडण्याची धडपड
अशोक चव्हाण यांनी मध्यावधी निवडणुकांचे भाकीत वर्तवले होते. यावर खडसे म्हणाले, आता ते विजनवासातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आमदारांना िटकवून ठेवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. या माध्यमातून ते विजनवासातून बाहेर पडण्याची धडपड करत असल्याचे सांगत त्यांनी मध्यावधीची शक्यता फेटाळली.