आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत: सुंदर होण्यापेक्षा जग सुंदर करण्याची जिद्द ठेवावी : आमटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खड्ड्यांचे शहर - अत्यंतहीन दर्जाची वागणूक मिळणाऱ्या कुष्ठरुग्णांनी आज आनंदवन ही पृथ्वीवरची स्वर्गभूमी बनवली आहे. ‘सुंदर मी दिसणार’ यासाठी झटण्यापेक्षा ‘हे जग सुंदर मी करणार’ हाच आनंदवनचा संदेश आहे. अशीच वाटचाल सर्वांनी करावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रातर्फे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचे शनिवारी (३ सप्टेंबर) व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते.

राजहंस प्रकाशन आणि समकालीन प्रकाशन यांच्या सहकार्याने ताराबाई स्त्री अभ्यास केंद्रातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रभारी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, ‘राजहंस’चे डॉ. सदानंद बोरसे, ‘समकालीन’चे आनंद अवधानी, केंद्राच्या संचालक डॉ. प्रतिभा अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. बाबा आमटे यांनी आनंदवन ही सामाजिक संस्था स्थापन करून हजारो कुष्ठरुग्णांच्या आयुष्यात प्रकाशाची फुले फुलवली. त्यांचा वारसा डॉ. विकास, डॉ. भारती, कौस्तुभ डॉ. शीतल नेटाने पुढे नेत आहेत. ‘आनंदवन-प्रयोगवन’ या समकालीन प्रकाशनतर्फे प्रकाशित ग्रंथात डॉ. विकास आमटे यांना आलेले अनुभव त्यांनी मांडले.

ते म्हणाले, बाबा आमटे यांनी १९४८ मध्ये ‘आनंदवन’ची स्थापना केली. या ठिकाणी अनेक शाळा, महाविद्यालये, उद्योग सुरू करून या वंचित घटकांना न्याय मिळवून दिला. समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं, सन्मानाचं जगणं मिळावं म्हणून त्यांनी बाबांनी प्रयत्न केले. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी प्रास्ताविक केले. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सहायक प्राध्यापक निर्मला जाधव यांनी आभार मानले.
‘आनंदवन’ आशेचा किरण : कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे
आज समाजाची अवस्था ‘सोशल पॅरालिसिस’ झाल्यासारखी असून ‘आनंदवन’सारख्या संस्था आशेचा किरण असल्याचे मत कुलगुरूंनी व्यक्त केले. जानेवारीत ‘स्वरानंदवन’ हा अंध, अपंग कुष्ठरुग्णांनी उभारलेला कार्यक्रम विद्यापीठातर्फे घेण्यात येईल. समकालीन राजहंस प्रकाशनतर्फे राबवण्यात येत असलेल्या वाचक-पुस्तक अभियानाची माहिती आनंद अवधानी यांनी दिली.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ.बी.ए. चोपडे. सोबत डॉ. प्रतिभा अहिरे.
बातम्या आणखी आहेत...