आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाकी शिवसेनेची दडपशाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लोकहिताच्या कामांची जबाबदारी असलेल्या नगरसेवकांनी लोकांच्या हिताच्या कामांवर मुद्देसूद आणि शिस्तीत चर्चा करावी, असे अपेक्षित असते. गेल्या वेळच्या मनपा कार्यकारिणीत ती पूर्ण झाली नाही. नव्या कार्यकारिणीतील नगरसेवक शनिवारी झालेल्या पहिल्या सभेतही जुन्यांचाच कित्ता गिरवताना दिसले. उपायुक्त पदोन्नती प्रस्तावावर शिवसेनेचे नंदकुमार घोडेले विकास जैन, महापौर त्र्यंबक तुपे यांच्याऐवजी मागच्या बाकांवर बसलेल्या भगवान घडामोडेंना उद्देशून बोलत होते, तर घडामोडे घोडेलेंवर पदोन्नतीचे ठेकेदार असा आरोप करत होते. छाया : मनोज पराती)
औरंगाबाद- सत्तेत सहभागी असलेल्या भाजपचा विरोध पायदळी तुडवत शिवसेनेने समांतरसाठी १५३ कोटींचे एचडीपीई पाइप खरेदीचा प्रस्ताव दडपशाही करत मंजूर केला. शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाविरुद्ध भाजपसह एमआयएम, काँग्रेसचे नगरसेवकही आक्रमक झाले होते. त्यांची मतदानाची मागणीही महापौर त्र्यंबक तुपे यांनी फेटाळली. यामुळे सभेत गोंधळही उडाला होता. आयुक्त प्रकाश महाजन गोव्याला गेल्याने अनेक प्रश्नांचे समाधानकारक उत्तरे िमळू शकली नाहीत.

लोकहिताचे आणि प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे विषय असलेल्या पहिल्या सभेला प्रारंभ होताच पाइप खरेदीचा मुद्दा उपस्थित झाला. जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या सभेत डीआय पाइप खरेदी करण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, त्यानंतर दोन मार्चच्या सभेच्या इतिवृत्तात ऐनवेळचा प्रस्ताव क्रमांक ७८८ घुसडण्यात आला. त्यात समांतरचा ठेका घेतलेल्या कंपनीला एचडीपीई पाइप वापरण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. त्या सभेत हा प्रस्ताव आलाच नाही. त्यावर चर्चाही झाली नाही. मग तो इतिवृत्तात आलाच कसा, असा प्रश्न उपमहापौर प्रमोद राठोड यांनी विचारला. महापौर, आयुक्त, कार्यकारी अभियंता, शहर अभियंता, नगर सचिवांच्या आवक, जावक रजिस्टरमध्ये नोंद नसलेला हा प्रस्ताव कुठून आला, असे घडामोडे म्हणाले. १४ लाख औरंगाबादकरांशी निगडीत असलेल्या समांतरविषयीचा निर्णय केवळ स्थायी समितीच्या बैठकीत कसा घेतला जाऊ शकतो, असेही घडामोडे म्हणाले.
म्हणे १५३ कोटी वाचतील
यावर स्पष्टीकरण करताना शहर अभियंता सखाराम पानझडे म्हणाले की, डीआयऐवजी एचडीपीई पाईप खरेदी केल्यामुळे मनपाचे पर्यायाने नागरिकांचे १५३ कोटी रुपये वाचणार आहेत. समांतरच्या पूर्ण योजनेत एचडीपीई पाईप वापरले जाणार नाहीत. फक्त १०० ते ३०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिन्या एचडीपीई पाईपच्या असतील. शासनाने आग्रह धरला तर डीआय पाईप वापरले जातील. त्यावर भाजपच्या सदस्यांनी एवढ्या लोकहिताच्या प्रस्तावावर त्यावेळी सर्वसाधारण सभेत चर्चा का केली नाही. तो इतिवृत्तात का आणि कुणाच्या सांगण्यावरून घुसडला, अशी विचारणा केली. त्याचे उत्तर पानझडे यांनी अखेरपर्यंत दिलेच नाही. एमआयएम, भाजप, काँग्रेस सदस्य आक्रमक होत मतदानाची मागणी करत असल्याचे लक्षात येताच तुपे यांनी इतिवृत्त मंजूर केल्याची घोषणा करून टाकली आणि पुढील कामकाजाचा पुकारा केला. त्यावर भाजप किंवा एमआयएमने सभात्याग किंवा कामकाजावर बहिष्काराचा मार्ग अवलंबला नाही, हे विशेष.
शाब्दिक चकमक : अय्युबखान यांनी उपायुक्तपदावर पदोन्नती देण्यावरून घडामोडे, घोडेले यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

शहरात इतर महत्त्वाचे विषय असताना हाच विषय का समाविष्ट केला.? त्यासाठी घोडेले यांनी ठेका घेतल्याचा आरोप घडामोडेंनी केला. त्यावर घोडेलेंनी आक्रमक होत शब्द परत घेण्याची मागणी केली. त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मतदानाची तरतूद नाही...१५३ कोटींच्या प्रस्तावात आयुक्तांचाही सहभाग...
बातम्या आणखी आहेत...