आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हयातीच्या दाखल्यासाठी ज्येष्ठ कामगारांच्या रांगा, पीएफ कार्यालयावर ताण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीबीस्टार - नोटाबंदीमुळे सध्या बँकांवर कामाचा ताण असल्याने ज्येष्ठ नागरिकांना भविष्य निर्वाह निधी कार्यालयामार्फत हयातीचा दाखला दिला जात आहे. यासाठी चिकलठाणा औद्योगिक परिसरातील मसिआ सभागृहात व्यवस्था करण्यात आली. मात्र, हे कार्यालय पहिल्या मजल्यावर असल्याने ज्येष्ठांची गैरसोय होत आहे. त्यातही शेकडो ज्येष्ठांसाठी केवळ एकच कर्मचारी असल्याने सेवानिवृत्त अंध, अपंग, वयोवृद्ध कामगारांना अतोनात त्रास होत आहे. तथापि, दाखला देण्याचे काम बँकांचे असून आम्हाला ते बंधनकारक नसल्याचे ईपीएफ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
भविष्य निवृत्तिवेतन योजना कायदा १९९५, तसेच कर्मचारी योजना १९९१ च्या कायद्याअंतर्गत सर्व सेवानिवृत्तांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयात प्रमाणपत्र काढणे गरजेचे आहे. पूर्वी ही सुविधा उपविभागीय कार्यालय आणि संबंधित बँकांमध्ये दिली जात होती. मात्र, कामाच्या अधिक ताणामुळे त्यांनी ही सुविधा बंद केली. यानंतर क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त कार्यालयाच्या आवाहनानंतर ही सेवा सिडको एन-१ येथील उपक्षेत्रीय कार्यालयात सुरू करण्यात आली. तसेच आधार कार्डाची मूळ प्रत, बँकेचे पासबुक मोबाइल सोबत घेऊन येण्यास सांगितले. मात्र, पुरेशा जागेअभावी ही सेवा चिकलठाणा येथील ‘मसिआ’ सभागृहाच्या वरच्या मजल्यावर २१ ते २५ या कालावधीसाठी सुरू करण्यात आली आहे. इथे निमशासकीय, खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या निवृत्तिवेतनधारकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे ज्येष्ठांना अडचणी येत आहेत.

लोकांनी मला उचलून नेले
मी वृद्ध अपंग असल्याने लोकांनी मला खूप सहकार्य केले. मला उचलून वरच्या मजल्यावर चढवण्यात आले. ज्यांनी साथ दिली त्यांच्यावर मी अन्याय केला. त्यांनीच आधी माझा नंबर लावून दिला. संबंधित विभागाने शहराच्या मध्यवर्ती भागात आणि खालच्या मजल्यावर सुविधा देण्याची गरज होती. लवांकुश दुबे

मुळात ही सेवा देणे आम्हाला बंधनकारक नाही. ही सेवा देण्याचे काम उपविभागीय अधिकारी आणि बँकांचे आहे. नोटाबंदीमुळे बँकांवर ताण येत असल्याने ही सुविधा आम्ही सुरू केली. लोकांनीच आपण कामानिमित्त बाहेर जात असल्याची जाणीव ठेऊन गरजेच्या वस्तू सोबत ठेवाव्यात. मसिआने आम्हाला ती जागा मोफत दिली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सुविधा देण्याबाबत फोर्स करू शकत नाही. आमच्याकडे यासाठी पर्यायी व्यवस्था नाही. आहे त्या कर्मचाऱ्यांमार्फत सुविधा उपलब्ध करून दिली. नागरिकांनी आम्हाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. एम.एच. वारसी, आयुक्त,उपक्षेत्रीय कार्यालय, औरंगाबाद.
बातम्या आणखी आहेत...