आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Economics Expert Dr.R.P. Kurulakar No More

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. र. पु. कुरुलकर यांचे निधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, मराठवाड्याच्या विकासाचे गाढे अभ्यासक डॉ. र. पु. कुरुलकर यांचे गुरुवारी हृदयविकाराने निधन झाले. ते 80 वर्षांचे होते.


डॉ. कुरुलकर यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक, वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषविली. राज्यातील मागास भागांचा अनुशेष निश्चित करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विजय केळकर समितीचे ते सदस्य होते. अर्थशास्त्र शिकवतानाच मराठवाड्याच्या जनतेसाठी त्याचा कसा वापर होऊ शकेल, हे त्यांनी आपल्या व्यासंगातून दाखवून दिले. मराठवाड्याच्या विकासाबाबत कायम अभ्यासपूर्ण आणि सखोल विश्लेषण करून विकासासाठी प्रसंगी भांडणारे अर्थतज्ज्ञ अशी ओळख असलेले डॉ. कुरुलकर काही दिवसांपासून हृदयविकाराने आजारी होते.


कुरुलकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांचे जावई अ‍ॅड. अजय देशपांडे यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी मान्यवरांनी गर्दी केली. रात्री उशिरा प्रतापनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, 4 मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.