आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदींचीबरीच आक्रमक धोरणे फसली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -  पंतप्रधान पदीविराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी त्यांच्या विदेश धोरणाला भूतान भेटीने सुरुवात केली. मात्र, पाकिस्तान, नेपाळ, चीनच्या बाबतीत ही धोरणे बऱ्याचअंशी अपयशी ठरली, असे मत परराष्ट्र धोरणविषयक अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी व्यक्त केले आहे. औरंगाबादमध्ये दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना भारताचे परराष्ट्र धोरण, भारत-पाक संबंध आदी विषयांवर विस्तृत चर्चा केली. त्यांच्याशी झालेली ही प्रश्नोत्तरे... 
 
Áभारत-पाकिस्तानसंबंधातीलसद्य:स्थितीबाबत काय मत? 
देसाई : भारतआणि पाकिस्तान संबंधातील सद्य:स्थिती चिंताजनक आहे. गप्प राहून किंवा सीमारेषेवर प्रत्युत्तर देऊन काहीच तोडगा निघणार नाही. अबोल्याचे दोन्ही देशांच्या संबंधांवर दूरगामी परिणाम होतील. केवळ दहशतवादामुळे संबंध बिघडत असतील तर तेही योग्य नाही. दोन्ही देशांतील जनतेला याबाबत काय वाटते हेही विचारात घ्यायला हवे. आपल्याप्रमाणेच पाकिस्तानातील सामान्य जनतेलाही युद्ध नकोय. 

Áसोशलमीडियावरील कथित वक्तव्यांमुळे या संबंधात दुरावा येतोय का? 
देसाई : सोशलमीडियावर सक्रिय नेटिजन्स आपापल्या देशाच्या बाजूने टीकाटिप्पणी करतच राहणार आहेत. मात्र, देशाचे धोरण सोशल मीडियावरून आलेल्या प्रतिक्रियांवरून ठरत नाही. मात्र, सद्य:स्थितीत काश्मीर मुद्दा, पठाणकोट किंवा उरी हल्ला यासारख्या प्रकरणांनंतर उमटलेल्या सोशल मीडियावरील प्रतिक्रिया काही प्रमाणात सरकारवर दबाव बनवण्यास कारणीभूत ठरल्या. 

Áकाश्मिरातील अराजकतेला पीडीपी आणि भाजपचे स्वतंत्र अजेंडे कारणीभूत वाटते काय? 
देसाई : मेहबुबामुफ्ती यांची काश्मीरचे मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा या नात्याने दोन स्वतंत्र भूमिका आहेत. केंद्रीय सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीवेळी मुफ्ती यांनी फुटिरतावाद्यांना चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांना दिलेले पत्र मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर पीडीपी प्रमुख या नात्याने होते. भाजप पीडीपीचा स्वतंत्र अजेंडा आहे. त्यामुळे त्याचाही फटका याठिकाणी मोठ्या प्रमाणात बसत आहे. 

Áबुरहानवानीला काश्मिरात शहिदाचा दर्जा दिला, याबाबत काय मत? 
देसाई : बुरहानबाबतकाश्मिरात प्रचंड भावनिक आकर्षण आहे. हिजबुलच्या पूर्वीच्या कमांडरप्रमाणे तो हिंसाचार किंवा दहशत निर्माण करत नव्हता. तर, त्याने सोशल मीडिया प्लॅटफार्मचा वापर केला. तेथील जनतेला त्याने आपलेसे करून ठेवले होते. जनतेची आपुलकी आणि लष्कर किंवा सरकारची भूमिका यातील द्वंद्वात हा मुद्दा गाजत आहे. 
बातम्या आणखी आहेत...