आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजितदादांसमोर खड्ड्यांवर सारस्वतांची तुफान बॅटिंग; फ. मुं. शिंदे, बोराडे यांनी काढले बोचरे चिमटे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - निमित्त होते पुस्तक प्रकाशनाचे, पण परिसंवाद रंगला चक्क औरंगाबादच्या खड्ड्यांवर. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार. मात्र हा कार्यक्रम गाजवला ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे आणि फ. मुं. शिंदे यांच्या खुमासदार किश्श्यांनी. देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहातील हा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी राजकीय व्यक्तींएेवजी सारस्वतांनीच गाजवला. दोघांनी श्रोत्यांना मनमुराद हसवले. नेहमी गंभीर असणारे अजित पवार यांनाही हसू आवरले नाही. 
 
प्रा. डॉ. उल्हास उढाण यांनी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यावर पीएचडी केली. त्याचा शोधनिबंध त्यांनी पुस्तकरूपाने प्रकाशित केला. या कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष रा. रं. बोराडे, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ. मुं. शिंदे, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, प्रा. डॉ. उमाकांत राठोड उपस्थित होते. ‘यशवंतराव चव्हाण : महाराष्ट्राचा आशय’ असे या पुस्तकाचे नाव असून त्यांच्या जीवनकार्यातील विविध पैलूंचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. प्रारंभी उढाण यांनी प्रास्ताविक, तर प्रा. राठोड यांंनी भाष्य मांडले. यानंतर बोराडे आणि शिंदे यांची खुमासदार भाषणे झाली. बोराडे म्हणाले, मी काही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ शकलो नाही, पण माझा विद्यार्थी झाला. (फ. मुं. कडे पाहत) मी ३७ वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले, पण पीएचडी करू शकलो नाही. माझ्या विद्यार्थ्याने पीएचडी केली. (उढाण यांच्याकडे पाहत) शिंदे यांच्या भाषणातील खड्ड्यांचा धागा पकडत अजित पवार म्हणाले, या शहराचे रस्ते भयंकर आहेत. ते चंद्रकांत पाटील म्हणतात, राज्यातील सर्व रस्ते चांगले करू. मात्र कधी होणार हे त्यांनाच ठाऊक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या सर्वच धोरणांवर त्यांनी बोचरी टीका केली. 
 
खड्ड्यातही क्रिएटिव्हिटी 
शिंदे म्हणाले, या शहरात सगळीकडे खड्डेच खड्डे दिसतात... आपण नावं ठेवतो... पण परदेशी पाहुणे हुशार आहेत. त्यांना त्या खड्ड्यातही क्रिएटिव्हिटी दिसते. खड्ड्यांच्या जवळ जाऊन ते नवलाईने न्याहाळू लागतात. आश्चर्याने तोंडात बोट घालतात अन् म्हणतात, खड्डे आमच्याकडेही आहेत, पण इथे खड्ड्याला जोडून रस्ता तयार करण्याचे अजब तंत्र पाहायला मिळाले. 
बातम्या आणखी आहेत...