आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ तबलावादक प्रमाेद भडकमकर यांचे निधन, नाशिकच्या कला वर्तुळाला माेठा धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिकच्या संगीत क्षेत्रातील एक हसतं-खेळतं व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले ऋग्वेद तबला अकादमीचे संचालक ज्येष्ठ तबलावादक प्रमाेद कमलाकर भडकमकर यांचे मंगळवारी (दि. ३०) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५३ वर्षांचे हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी अर्चना अाणि मुलगी तबलावादक वैष्णवी या अाहेत. त्यांच्या अशा अचानक जाण्याने नाशिकच्या कलावर्तुळाला माेठा धक्का बसला अाहे. 

दरम्यान, सायंकाळी वाजता अत्यंत शाेकाकुल वातावरणात त्यांच्यावर अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात अाले. यावेळी शहरातील संगीत, नृत्य, नाट्य, कलाकारांसह पूर्णवाद परिवार, एसएमअारके महाविद्यालयातील शिक्षक अाणि मान्यवरांसह जनसमुदाय उपस्थित हाेता. तबलावादनातही अापण सतत नवीन काहीतरी केलं पाहिजे असा ध्यास असलेले प्रमाेद भडकमकर यांची प्रकृती अत्यंत चांगली हाेती. सकाळी ते माॅर्निंग वाॅकलाही गेले हाेते, त्यानंतर जनस्थान या कलावंतांच्या व्हाॅट‌्सअॅप ग्रुपवर त्यांनी कलावंतांशी संवादही साधला. मात्र, थाेड्या वेळातच ते घरामध्ये काेसळले. त्यांना तत्काळ मॅग्नम रुग्णालयात दाखल करण्यात अाले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले हाेते.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहरातील कलाकार अाणि त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतली. सावकरनगर येथील त्यांच्या निवासस्थानी अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने एक हसतं-खेळतं व्यक्तिमत्त्व गेल्याने नाशिकच्या संगीत क्षेत्रात माेठी पाेकळी निर्माण झाल्याच्या भावना कलाकारांनी व्यक्त केल्या अाहेत.  
बातम्या आणखी आहेत...